नागपूर : इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानात (Electronic device shop) काम करणारे नोकर चोर निघाले आहेत. स्वतःच्या मालकाचे दुकान फोडून लाखोंचा माल लंपास केला आहे. पोलिसांनी (nagpur police) ज्यावेळी झाडू मारणाऱ्या कामगारांची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्यामध्ये विसंवाद झाला. पोलिसांनी (crime news in marathi) या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर चोरीला गेलेला माल सुध्दा हस्तगत केला आहे. या प्रकरणाची पोलिस अजून कसून चौकशी करीत आहे.
नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत इलेक्ट्रॉनिक दुकानात मोठी चोरी झाली. लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला असल्यामुळे दुकानदाराने पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी तपास चक्र फिरवत आरोपीचा शोध सुरू केला. मात्र पोलिसांना दुकानातील नौकारावर संशय व्यक्त केला. त्याचबरोबर त्याची उलट तपासणी केली. त्यांनी चोरी कबूल करत चोरलेला माल कोणाला विकला हे सुद्धा सांगितलं आणि पोलिसांनी दोन नोकरांसोबत माल विकत घेणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. चोरट्यांनी चोरलेला सगळा माल पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती पाचपावली पोलीस स्टेशनचे पीएसआय राजेश डोंगरे यांनी दिली.
नागपूरमध्ये मागच्या काही दिवसांपासूनम अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीचा बंदोबस्त वाढवला आहे. सीसीटिव्हीच्या मदतीने आतापर्यंत अनेक चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी विविध पथक तयार केली आहेत. पथकांनी अनेक चोरट्यांना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर त्याचा फायदा होत आहे.