उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये पाणीपुरवठा विभागातील एका कनिष्ठ अभियंत्याने (engineer) काही दिवसांपूर्वी आपली पत्नी आणि मुलीसोबत आत्महत्या (suicide) केली होती. शैलेंद्र कुमार असे या अभियंत्याचे नाव होते. आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शैलेंद्र कुमार यांनी आपल्या घरात केक कापला होता. हा केक त्यांनी त्यांची मुलगी आणि पत्नीला देखील खावू घातला. एवढेच नाही तर केक खाताना त्यांनी ‘आता आपल्या सर्वांना पुढील जन्म दिवसाच्या शुभेच्छा असे देखील म्हटले होते. शैलेंद्र कुमार हे आपल्या कुटुंबासोबत जानकीपुरम परिसरात रहात होते, त्यांनी काही दिवसांपूर्वीच विषप्राशान करून आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केली होती. शैलेंद्र कुमार हे पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत होते. या घटनेबाबत त्यांचे शेजारी लवकुश यांनी सांगितले की, त्यांनी विष पिल्यानंतर आम्हाला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा आम्ही दरवाज्यावरून उडी मारून आत पोहोचलो तेव्हा ते तडफडत होते.
पुढे बोलताना लवकुश यांनी सांगितले की, आम्ही घराच्या दरवाजावरून उडी मारून आता पोहोचलो, त्यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आम्हाला रुग्णालयात जायचे नाही म्हणत विरोध केला. हे ऐकूण आम्हाला देखील आश्चर्य वाटले, मात्र बऱ्याच प्रयत्ननंतर आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन पोहोचलो मात्र त्यानंत काही मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला.डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मिळत असलेल्या माहितीनुसार आत्महत्या करण्यापूर्वी शैलेंद्र कुमार याने केक ऑडर केला होता. हा केक खाण्यापूर्वी त्यांने त्यात विष घातले. त्यानंतर केक कापण्यात आला, त्याने तो केक आपली पत्नी आणि मुलीला खाऊ घातला. केक खाल्ल्यानंतर आपल्या सर्वांना पुढील जन्म दिवसाच्या शुभेच्छा असे तो म्हटला. त्यानंतर काही तासांमध्येच त्या तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान केक कापण्यापूर्वी त्यांने आपल्या ऑफीसमधील एका सहकाऱ्याला देखील आत्महत्येची कल्पाना दिली होती. त्या सहकाऱ्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली, मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत उशीरा झाला होता.