नाशिक : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील एका तरुणाला नागरिकांनी चोर म्हणून बेदम मारहाण केली आहे. हे कमी की काय पोलीसांनी देखील या तरुणाला प्रसाद दिला आहे. सिन्नर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोर आला रे चोर आला अशी आवई सुटली आहे. अशातच एका तरुणाला नागरिकांनी पकडले होते. खरंतर बुधवारी रात्रीची ही घटना आहे. नांदूर शिंगोटे गावाच्या बाजूलाच शिवाजी आव्हाड या व्यक्तीचा बंगला आहे. त्यांच्या या बंगल्यावर रात्री एक वाजेच्या दरम्यान दरोडयाचा पडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी पुन्हा याच भागात शेळके यांच्या बंगल्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, नागरिक सावध असल्याने चोरटे डोंगराच्या दिशेने पळाले होते. ही सगळी पळापळ सुरू असतांना सिन्नर तालुक्यातील एक तरुण पोलीसांच्या तावडीत सापडला होता. गंमत म्हणजे हा तरुण चोरांच्या टोळीतीळ नव्हता. पण तरीही स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांणी त्याला चांगलाच प्रसाद दिला होता.
चोरांना पकडत असतांना स्थानिक तरुणांच्या धावपळीत हा अनोळखी तरुण कोण म्हणून खरंतर पोलीसांच्या हाती लागला होता.
पोलीसांनी चोर म्हणून त्याची चौकशी सुरू केली मात्र त्यात त्या तरुणाचे प्रयोजन वेगळेच असल्याचे समोर आले आहे.
खरंतर मित्रासाठी गुन्हा अंगावर घेतला… वेळ आली तेव्हा पोलिसांचाच काय नागरिकांचा मारही खाल्ला, पण त्याने खरं कारण सांगितलं नसून गुन्हा देखील अंगावर घेतला आहे.
मित्राला प्रेयसीच्या भेटीसाठी सोडवून नांदूर शिंगोटे गावाकडे परतणाऱ्या या तरुणाची अवस्था म्हणजे बळीचा बकरा बनल्या सारखी झाली आहे.
मित्राचे भिंग फुटू नये म्हणून या तरुणाला पोलिसांचा पाहुणचार आणि स्थानिकांचा प्रसाद खाण्याची वेळ आली होती.
हा प्रकार तरुणाने गुन्हा दाखल झाल्यावर सांगितल्याने पोलीसही आश्चर्य व्यक्त करू लागले आहेत, मार ही खाल्ला, मैत्रीही जागळी म्हणून य घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.