देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सायकल कंपनी ॲटलसचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांनी आपले जीवन संपवले आहे. 3 सप्टेंबर मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांनी आपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. दिल्लीमधील अब्दुल कलाम लेन परिसरामध्ये ही घटना घडली आहे. सलील यांच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना एक चिट्ठी मिळाली आहे. या चिट्ठीमध्ये चार जणांची नावे असून त्यांनी छळ केल्याचा आरोप त्यामध्ये केल्याची माहिती समजत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलील कपूर यांच्या तीन मजली घरात ग्राऊंडफ्लोरलाच त्यांचा मृतदेह आढळला.कपूर यांच्या घरच्यांना पूजा घराच्याजवळ त्यांचा मृतदेह रक्तान माखलेल्या अवस्थेत दिसला. काही वेळातच त्यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलीस फॉरेन्सिकज्ञांसह फिंगरप्रिंट्स काढण्यासाठी घटनास्थळी भेट दिली. एक धक्कादायक बाब म्हणजे सलील कपूर यांच्या वहिणी नताष कपूर यांनीही 2020 मध्ये आपले जीवन संपवले होते.
Salil Kapoor, a former president of Atlas Cycles, died allegedly by shooting himself at his residence at Doctor APJ Abdul Kalam Lane. Police team is present at the spot and is investigating the matter. A suicide note has been recovered, allegations of harassment has been made…
— ANI (@ANI) September 3, 2024
सलील कपूर हे 9 कोटी रूपयांच्या दोन प्रकरणांमध्ये आरोपी होते. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती. डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. सलील कपूर यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिट्ठीमध्ये चार लोकांची नावे आहेत. ते चार लोक कोण याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, त्यामध्ये हे लोक मानसिक शारीरिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.