मुंबई : मुंबईतील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (Mumbai eastern express highway accident) चुनाभट्टीजवळ एका मिक्सर वाहनाने (dumper accident) चार वाहनांना जोराची धडक दिली आहे. त्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू जागीचं झाला आहे. दोघेजण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात सकाळी साडेआठच्या सुमाराम घडला आहे. अॅक्टिवा चालक असलेल्या व्यक्तीचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. अब्दुल शेख असं त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नावं आहे. इतर जखमींवरती जवळच्या सायन रुग्णालयात (Sion Hopital) उपचार सुरु आहेत.
अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तिथं धाव घेतली. पाऊस असल्यामुळे अपघात झाल्यानंतर वाहनं बाजूला घेण्यास अडचण निर्माण झाली होती. काही वेळाने तिथली सगळी वाहनं बाजूला घेतल्यानंतर रस्ता मोकळा झाला.
ठाण्याच्या दिशेने वेगाने निघालेल्या मिक्सर वाहनाने काही वाहनांना धडक दिल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी मोठा आवाज झाला. अब्दुल शेख असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो अक्टिव्हाने प्रवास करत होता.
सूरज सिगवान आणि अब्दुल वाहिद सिद्दीकी अशी या अपघातातील जखमींची नावे असून त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर चुनाभट्टी जवळ ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या मिक्सरने चार वाहनांना जोरदार दिली धडक यात एकाचा मृत्यूतर तिघे जखमी झाल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृतदेह पोलिसांनी सायन रुग्णालयात दाखल केला असून शवविच्छेदन झाल्यानंतर अब्दुल शेख यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.