आई-वडिलांचं भांडण सुरु होतं, मुलगा मध्ये पडला म्हणून बाप संतापला अन्…

| Updated on: Jun 19, 2023 | 4:26 PM

आई-वडिलांचे भांडण सुरु होते. तरुण मुलगा मध्यस्थी करायला गेला. पण बापाला मुलाची मध्यस्थी आवडली नाही. मग जे घडलं ते भयंकर होतं.

आई-वडिलांचं भांडण सुरु होतं, मुलगा मध्ये पडला म्हणून बाप संतापला अन्...
क्षुल्लक कारणातून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या
Image Credit source: TV9
Follow us on

दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. पूर्व दिल्लीतील मधु विहार परिसरात घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आई-वडिलांच्या भांडणात पडणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलगा मध्ये पडला म्हणून संतापलेल्या बापाने त्याच्यावर चाकूहल्ला केला. यात मुलगा जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाली नाही. उपचारानंतर तरुणाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशोक कुमार सिंह असे आरोपी पित्याचे नाव आहे, तर आदित्य असे मुलाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

अशोक कुमार हे सिनिअर इंजिनिअर पदावरुन निवृत्त झाले आहेत. ते पत्नी मंजू आणि मुलगा आदित्यसह मधु विहार परिसरात राहतात. मुलगा आदित्यही गुरुग्राममध्ये कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे. अशोक कुमार यांनी नुकतेच नवीन घर खरेदी केले होते. या घराचे काही पेमेंट देण्यासाठी त्यांनी मंजूला मोबाईलवर नो ब्रोकर अॅप डाऊनलोड करायला सांगितले. मात्र काही कारणाने पत्नीला अॅप डाऊनलोड करायला वेळ लागला. यावरुन अशोक कुमार संतापले.

क्षुल्लक कारणातून पती-पत्नीमध्ये भांडण सुरु झाले. यावेळी मुलगा घरी होता. मुलगा आई-वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला. यामुळे वडील संतापले आणि त्यांनी मुलावर चाकूने हल्ला केला. मुलगा यात जखमी झाला, मात्र सुदैवाने त्याचा जीव बचावला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

हे सुद्धा वाचा