नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : एका महिला आपल्या रूमची साफसफाई करत होती. साफसफाई करता असताना तिला तिच्या वडिलांची एक जुनी पेटी सापडली. वडिलांचं नुकतचं ऑक्टोबरमध्ये निधन झालं होतं. त्यामुळे वडिलांची ती जुनी पेटी पाहून मुलीला आनंद झाला. वडिलांच्या काही जुन्या आठवणी त्यामध्ये असतील असे समजून तिने ती पेटी उघडली. पण, त्यातील वस्तू पाहून तिचे हातपाय गळाले. दरदरून घाम फुटला. तिने पोलिसांना बोलावले. पोलीस ती वस्तू पाहून थक्क झाले आणि थेट आर्मीलाच त्या ठिकाणी बोलावले. ही घटना कॅनडातील क्यूबेक येथे घडलीय.
क्यूबेक येथे राहणाऱ्या केड्रिन सिम्स ब्रॅचमन यांचा घरी अशी वस्तू सापडली की ज्यामुळे थेट आर्मीलाच बोलवावे लागले. केड्रिन हिचे वडिल फ्रँक यांचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. घरात साफसफाई करताना केड्रिन हिला वडिलांची एक जुनी पेटी सापडली. तिने ती उघडली तेव्हा तिला त्यात जिवंत बॉम्ब असल्याचे दिसले.
केड्रिन हिने सावधपणा दाखवून पोलिसांशी संपर्क साधला. एक पोलिस अधिकारी त्यांच्या घरी आला तेव्हा त्याने तो जिवंत बॉम्ब पाहून कॅनेडियन सैन्याला घरी बोलावणे आवश्यक आहे असे सांगितले. त्याने कॅनेडियन आर्मीच्या सैनिकांना फोन केला. आर्मीचे जवान घरी पोहोचले. त्यांनी ग्रेनेड पाहिला तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. कारण, इतके वर्ष जुने ग्रेनेड अजूनही जिवंत होते. त्याची पिन काढली तर त्याचा मोठा स्फोट झाला असता. लष्कराच्या जवानांनी ग्रेनेड सुरक्षित ठेवून सोबत नेला.
केड्रिनने सांगितले की हा ग्रेनेड अनेक वर्षांपूर्वी आम्ही घरात पाहिला होता. पण, नंतर तो दिसला नाही. त्यामुळे तो वडिलांनी कुठेतरी नेला असावा असा आमचा समाज झाला होता. पण तो चुकीचा समज होता. हा जिवंत ग्रेनेड आजपर्यंत घरात ठेवण्यात आला होता. हा आमच्या जीवाला फार मोठा धोका होता असे तिने म्हटले.
सुमारे 30 वर्षांपूर्वी माझे वडील फ्रँक यांनी माझ्या आजोबांच्या घरून हा ग्रेनेड आणला होता. आम्ही सर्वांनी तो फेकून देण्तास सांगितले होते. नंतर तो ग्रेनेड दिसला नाही त्यामुळे ते फेकून दिले असावे असे वाटले. पण, त्यांनी तसे केले नव्हते. आम्ही अनेक वेळा घर बदलले. तेव्हा तेव्हा ती पेटी आम्ही सोबत नेली, हलविली पण त्यामध्ये ही वस्तू असेल असा आम्हाला कधीच संशय आला नाही. ती वस्तू आमच्या सामानात आहे हे आम्हाला माहितही नव्हते. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना घडू शकली असती असेही केड्रिन म्हणाली.