रांची : झारखंड मधील महेशपुर येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे पिता-पुत्राने, (father and son) दोघांनी क्रूरपणे दाखवत जावयाचा (killed son in law) भरदिवसा रस्त्यावर चाकूने वार करून खून केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. वास्तविक हे संपूर्ण प्रकरण महेशपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बासमती गावाशी संबंधित आहे. जिथे पिता-पुत्रांनी मिळून विश्वजित गोराईची भरदिवसा हत्या केली. मारेकरी पिता-पुत्राने क्रूरता दाखवत विश्वजित गोराई याच्यावर चाकूने अनेक वार केले, यात विश्वजितचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी ही हत्या केल्यानंतर आरोपी पिता-पुत्र वीरू मंडल आणि सीताराम मंडल हे घटनास्थळावरून पसार झाले.
विश्वजितचे पहिले लग्न 2020 साली वीरू मंडलची मुलगी पायलसोबत झाले होते. मात्र हुंड्याची मागणी आणि इतर वादांमुळे पायल ही तिच्या सहा महिन्यांच्या मुलीसोबत तिच्या माहेर रहात होती. यानंतर 16 मार्च 2021 रोजी पायलचा मृतदेह घरापासून हाकेच्या अंतरावर झुडपातआढळून आला. या हत्येप्रकरणी पायलच्या नातेवाईकांनी जावई विश्वजीत गोराई, सासरे करण गोराई आणि मेघा गोराई, भैरव गोराई यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी विश्वजीतला ताब्यातही घेतले होते, मात्र पुराव्याअभावी त्याची कारागृहात रवानगी होऊ शकली नाही. हळूहळू पोलिसांनी हे प्रकरण सोडून दिले. पण पायलचे कुटुंबीय सूडाच्या भावनेने आतून जळत होते. 10 मे रोजी हरीशपूर गावातील प्रियांका कुमारी हिच्याशी विश्वजीतने लग्न केल्याने त्यांचा राग अजून वाढला. यामुळे पायलचे कुटुंबीय भडकले आणि ते सूड उगवण्यासाठी संधी शोधत होते.
जेव्हा विश्वजीत त्याच्या दुसऱ्या पत्नीसह पूजेसाठी जात होता, तेव्हा पिता-पुत्राने दोघांना घेरले आणि विश्वजीतची हत्या केली. लग्नाला अवघा महिनाही उलटला नाही तोच प्रियांकाचे कुंकू पुसले गेले. या घटनेते तीही जखमी झाली.
त्याचवेळी महेशपूरचे एसडीपीओ नवनीत हेमरोम म्हणाले की, पोलीस या हत्येप्रकरणी गांभीर्याने काम करत आहेत. प्रकरणाचा त्वरीत तपास करून आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले जाईल.