चंदीगड | 11 ऑगस्ट 2023 : मुलं चुकली तर पालक त्यांना शिक्षा करतात, ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी.. पण पंजाबमध्ये एका पित्याने त्याच्या मुलीच्या एका चुकीची एवढी क्रूर शिक्षा (crime news) दिली की सर्वांचा थरकाप उडाला. मुलीची ती एक चूक जीवघेणी ठरली. एका मुलावर प्रेम केलं आणि त्याच्यासोबत पळून गेल्यानंतर मुलगी मात्या-पित्यांना भेटण्यासाठी परत आली, पण… ती तिची शेवटचीच भेट (honor killing) ठरली.
हृदय पिळवटून टाकणारी एक घटना पंजाबमध्ये घडली जिथे जन्मदात्या पित्यानेच त्याच्या मुलीची हत्या केली. आणि बाईकच्या मागे तिला बांधून फरपटत घेऊन गेला. आणि हे सर्व का तर, त्यांच्या (खोट्या) मानासाठी. पोटची मुलगी दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली आणि घरदार सर्व सोडून त्याच्या सोबत पळून गेली. या गोष्टीच्या तिच्या पित्याला एवढा राग आला की त्याने हे धक्कादायक कृत्य करताना जराही मागचा -पुढचा विचार केला नाही. दुसऱ्या दिवशी ती मुलगी आई-बाबांना भेटण्यासाठी परत आली असता, संतप्त पित्याने तिला दोरीच्या सहाय्याने बाईकच्या मागे बांधले आणि तो बाईकवर बसून भरधाव वेगाने निघाला.
सीसीटीव्हीत झाले कृत्य कैद
रस्त्यावरून जाताना त्याची मुलगी आपटत होत, व्हिवळत होती पण त्याला जराही पाझर फुटला नाही. तो तसाच पुढे गेला. अखेर रेल्वे लाइन जवळ स्थानिकांना तिचा मृतदेह सापडला असता त्यांनी पोलिसांना कळवले. अमृतसरच्या मुछाल गावात ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली असून बाईकवर बसलेल्या इसमाच्या मुलीचे शरीर फरपटत जाताना दिसत आहे. हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, वडिलांनी स्वत:च्या मुलीबद्दल केलेल्या या कृत्याचा सर्वत्र निषेध होत आहे.