आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच पित्याचं आयुष्य संपणं याहून एखादी अधिक दुर्दैवी घटना असूच शकत नाही. मात्र अशी एक दुर्दैवी घटना घडली आहे. बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका कुटुंबावर दु:खाचा हा आघात झाला. मुलाच्या वाढदिवसाचा आनंद घरात असतानाच, घरातल्या कर्त्या पुरूषाने गळफास लावत आपलं आयुष्य संपवल. यामुळे सर्वांनाच मोठा ध्काक बसली असून घरावर शोककळा पसरली आहे. जिथे थोड्या वेळापूर्वी आनंदाचं वातावरण होतं, तिथे अचानक सर्वांनी दु:खाने टाहो फोडला. पत्नीशी वादविवाद झाल्यावर त्या इसमाने आत्महत्येचे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. सध्या पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार प्रोफेसर कॉलनीत शनिवारी संध्याकाळी उशीरा हा दुर्दैवी घटना घडली. सत्येंद्र प्रसाद यांचा मुलगा सुधांशु शेखर ( वय 45) असे मृताचे नाव असूनते मुरादपूर येथे रहायचे. ते समस्तीपूर येथील वीज विभागत अकाऊंटंट म्हणून नोकरी करायचे. तेथे प्रोफेसर कॉलनीमध्ये एका भाड्याच्या घरात पत्नी-मुलासह रहात होता. त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून सुधांशु शेखर यांच्या पत्नीची, पूनमची चौकशी करण्यात येत आहेय
पत्नीशी झाला वाद
त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने घरात सेलिब्रेशन होतं. काही लोकांना जेवणासाठी बोलावण्यात आलं होतं, त्यामुळे पूनम तयारीत व्यस्त होत्या. पूनमच्या सांगण्यानुसार, तिचे पती ऑफिसमधून घरी परतले आणि सेलिब्रेशनच्या मुद्यावरून त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यानंतर तो रागाने खोलीत गेला. अर्धा तास होऊनही तो बाहेर न आल्याने पूनमने आत जाऊन पाहिले, तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालीच जमीनच सरकली. खोलीत आतमध्ये तिच्या पतीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. पूनमने हंबरडा फोडला, तिचा आवाज ऐकताच सगळे लोक धावत आले, समोरचं दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
सायबर फसवणुकीमुळे बसला धक्का
पोलिसांच्या सांगण्यानुसार, काही दिवसांपासून मृत सुधांशूची मनस्थिती ठीक नव्हती. काही दिवसांपूर्वीच त्याला सायबर फसवणुकीमुळे मोठा धक्का बसला होता, तेव्हापासूनच तो तणावात होता. त्यानंतर त्यांच्या घरातही वादविवाद सुरू झाले होते. त्यामुळेच त्याने हे टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे. पोलीसांकडून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.