आगीने घराला वेडा घातला, चार मुली जळाल्या, सहाजण गंभीर भाजले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

| Updated on: May 02, 2023 | 11:41 AM

रात्री उशिरा सदर पोलिस स्टेशनच्या परिसरात रामदयालु स्टेशनच्या जवळ झोपडीनुमा घराला आग लागली. त्या घराच्या मालकाचं नाव नरेश राम आहे. बघता बघता आगीने संपुर्ण घराला वेडा घातला.

आगीने घराला वेडा घातला, चार मुली जळाल्या, सहाजण गंभीर भाजले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
bihar
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुजफ्फरपुर : बिहार (bihar) राज्यातील मुजफ्फरपुरमधील (Muzaffarpur) सदर परिसरात रात्री अचानक आग लागली. त्यामध्ये चार मुली जळाल्या (4 girls burnt alive) असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. सहाजण गंभीर भाजले आहेत. सगळ्या जखमींना एसकेएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी असलेल्या सगळ्यांची तब्येत गंभीर आहे. ज्यावेळी आग लागल्याची माहिती पोलिस आणि अग्नीशमन दलाला समजली. अग्नीशमम दलाने आणि तिथल्या लोकांनी आग विझवली आहे. तीन घरांना रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली होती. आग वाढल्यामुळे चार मुलींचा मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरा सदर पोलिस स्टेशनच्या परिसरात रामदयालु स्टेशनच्या जवळ झोपडीनुमा घराला आग लागली. त्या घराच्या मालकाचं नाव नरेश राम आहे. बघता बघता आगीने संपुर्ण घराला वेडा घातला. आग इतकी भयानक होती की, त्यामधून घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडण्यास अधिक विलंब झाला. त्यामुळे चार मुलींचा जागीचं जळून मृ्त्यू झाला.

शेजाऱ्यांची घरं सुद्धा जळाली

या घटनेमध्ये 12 वर्षीय सोनी, 8 वर्षीय शिवानी, 5 वर्षीय अमृता और 3 वर्षीय रीता यांचा मृत्यू झाला आहे. आग इतकी भयानक होती, या दुर्घटनेतून मुलींना बाहेर काढणे मुश्कील झाले होते. आगीमुळे शेजाऱ्यांच्या घराला सुध्दा आग लागली. आगीच्या दुर्घटनेत साधारण अर्धा डजन लोकं भाजली, गंभीर भाजलेल्या लोकांचा उपचार एसकेएमसीएच रुग्णालयात सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

आग थांबवण्यासाठी लोकांना मोठा संघर्ष करावा लागला

अग्निशमन विभागाला सुचना मिळाल्यानंतर त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. परंतु तोपर्यंत संपुर्ण घराला आगीने वेढलं होतं. जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी मृत्यू झालेल्या चार मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.