Video : मुंबईच्या खारमधील गजेबो शॉपिंग सेंटरवर गोळीबार

| Updated on: Aug 12, 2022 | 12:36 AM

पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे दोन अज्ञात इसम मोटरसायकलने आले आणि त्यांनी शॉपिंग सेंटरचा समोरच्या रस्त्यावर त्यांची बाईक पार्क केली आणि त्यानंतर रोड क्रॉस करून ते चालत आले आणि गजेबो शॉपिंग सेंटर समोर फायरिंग केली. आरोपी फायरिंग करून फरार झाले.

Video : मुंबईच्या खारमधील गजेबो शॉपिंग सेंटरवर गोळीबार
Follow us on

मुंबई : मुंबईच्या खार(Khar) परिसरामध्ये गजेबो शॉपिंग सेंटरवर( Gazebo Shopping Center ) अज्ञात इसमानी फायरिंग(Firing) केल्याची घटना गुरुवारी रात्री घडल्याने या परिसरात एकच खळबळ माजली. पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे दोन अज्ञात इसम मोटरसायकलने आले आणि त्यांनी शॉपिंग सेंटरचा समोरच्या रस्त्यावर त्यांची बाईक पार्क केली आणि त्यानंतर रोड क्रॉस करून ते चालत आले आणि गजेबो शॉपिंग सेंटर समोर फायरिंग केली. आरोपी फायरिंग करून फरार झाले. मात्र, जाताना त्यांनी घटनास्थळी एक पत्र टाकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दिली आहे त्या पत्रात असा उल्लेख आहे की इथे धंदा करू नये.

बांद्राच्या लिंकिंग रोड हा नेहमीच गजबजलेला असतो . संध्याकाळच्या वेळी ही घटना झालेली तेव्हा या परिसरात मोठ्या संख्येत लोक उपस्थित होते.आरोपींनी फायरिंग केली आणि ते घटानस्थाळवरु फरार झाले.सुदैवाने या प्रकरणात कुणीही जखमी झाले नाही. मात्र तात्काळ घटनास्थळी स्थानिक डीसीपी मंजुनाथ सिंगे ,खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मोठ्या संख्येत पोलीस दल दाखल झाले. संपूर्ण परिसर बैरिकेट  लावण्यात आले. पोलिसांनी या संदर्भात परिसरातल्या सीसीटीव्ही आणि व्यापाऱ्याच्या माहिती प्रमाणे चौकशी सुरू केलेली आहे.

या घटनेचा मागे आरोपी कोण आहेत याचा अद्याप काही सुगावा लागलेला नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. शॉपिंग सेंटरचे काही दुकानदार यांच्या असं म्हणणं आहे की शॉपिंग सेंटरच्या आंत मध्ये जे दुकानदार आहेत त्यांचा ह्या घटनेची संबंध नाही असं काही दुकानदार आपली ओळख ना सांगता म्हणत आहेत. मात्र, हा वाद फुटपाथ वर धंधा लावण्या संदर्भात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. या घटनेचा मागे आरोपी कोण होते ज्यांनी फायरिंग केली किंवा घटनेचा मूळ कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी अद्याप कुठलीही अटक झालेली नाही .