Jaipur-Mumbai Train Firing | मुलगा गोव्यात, पत्नी-मुलगी घरी…. ASI टीकाराम यांच्या मृत्यूबाबत कुटुंबिय अद्यापही अनभिज्ञ ?

| Updated on: Jul 31, 2023 | 2:13 PM

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमधील गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात एएसआय टीकाराम यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला.

Jaipur-Mumbai Train Firing | मुलगा गोव्यात, पत्नी-मुलगी घरी....  ASI टीकाराम यांच्या मृत्यूबाबत कुटुंबिय अद्यापही अनभिज्ञ ?
जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबारातील चौथ्या मृतदेहाची ओळख पटली
Follow us on

मुंबई | 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये (train) सोमवारी सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सर्वच हादरले आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 5 वाजून 23 मिनिटांनी ही धक्कादायक घटना घडली. आरपीएफचा कॉन्स्टेबल चेतन याने हा गोळीबार केला. या गोळीबारात एएसआय टीकाराम मीणा यांच्यासह आणखी तिघाजणांचा मृत्यू झाला.

गोळीबारामुळे हे चौघेही जागीच मृत्यूमुखी पडले. जयपूर-मुंबई पॅसेंजमधील बी-5 कोचमध्ये ही घटना घडली. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन याने हा गोळीबार केला. तेव्हा तो एस्कॉर्ट ड्युटीवर होता. गोळीबारानंतर त्याने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले एएसआय टीकाराम हे राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील श्यामपुरा गावचे रहिवासी होते.

या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण श्यामपुरा गावावर शोककळा पसरली आहे. सर्व गावकरी या घटनेमुळे निशब्द झाले आहेत. मात्र एएसआय यांच्या पत्नीला या घटनेबाबत अद्याप गावकरी व कुटुंबियांनी काहीही सांगितलेले नाही. आत्ताच त्यांना याबाबत सांगितल्यास त्या अतिशय भावुक होतील. एएसआय टीकाराम यांचा मृतदेह (गावात) येण्यास अद्याप बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे त्यांच्या घरच्यांना या गोष्टीची कल्पना देण्यात आलेली नाही.

कुटुंबियांना अद्याप दिली नाही माहिती

या घटनेबाबत बोलण्यासाठी कोणीही त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचू नये याची काळजी घेण्यात येत आहे. मृत एएसआय टीकाराम यांना एका मुलगा व मुलगी असून लेकीचे लग्न झाले आहे. तर मुलगाही विवाहीत असून झाले असून तो बेरोजगार असल्याचे समजते. तो सध्या गोव्याला गेला आहे. त्याला या घटनेबाबात समजले असून तो परत येण्यास निघाल्याचे समजते.

संपूर्ण गावावर पसरली शोककळा

टीकाराम यांच्या घराच्या आसपास शांतता आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांची पत्नी व आई यांना अद्याप याबाबत सांगण्यात आलेले नाही. मृत एएसआय टीकाराम शेतकरी परिवारातून असून त्यांच्या नावे काही जमीन आहे. त्यांचा मृतदेह येण्याची गावकरी वाट बघत आहेत.