पोलिसांना कोण देतंय आव्हान, खुले आम गोळीबार झाल्याने शहर हादरलं

| Updated on: Nov 10, 2022 | 1:52 PM

नाशिक शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातक खुले आम हवेत गोळीबार केला जात असल्यानं पोलिसांना कोण आव्हान देतंय ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

पोलिसांना कोण देतंय आव्हान, खुले आम गोळीबार झाल्याने शहर हादरलं
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी काही केल्या थांबायला तयार नाहीये. नाशिक शहरात, खून दरोडे, हाणामाऱ्या, दुचाकी चोरी, चारचाकी चोरी, अल्पवयीन मुलींचे अपहरण अशा विविध घटना घडत असतांना अंबड पोलीस ठाण्यात हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या सातपुर अंबड लिंकरोडवर ही घटना घडली आहे. किरकोळ वादातून थेट हवेतून गोळीबार केल्याने पोलिसांची चिंता वाढली असून आरोपी फरार आहे. ही गोळीबाराची घटना घडतात शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्यासह पोलीस दलातील विविध पथके घटणास्थळी दाखल झाले होते. गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध नाशिक पोलीस घेत आहे. वादाचे कारण समोर आले नसले तरी या घटणेने शहर हादरून गेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नाशिक दौऱ्यावर येण्याच्या काही तास ही घटना घडल्याने पोलिसांचा शहरात धाक राहिला नाही का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

नाशिक शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातक खुले आम हवेत गोळीबार केला जात असल्यानं पोलिसांना कोण आव्हान देतंय ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची स्थिती पाहता शहरात हाणामाऱ्या, अपहरण, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे.

नाशिक शहरातील पोलिसांना गुन्हेगार आव्हान देत आहेत का ? पोलीस गुन्हेगारांकडे दुर्लक्ष करत आहे का ? शहरातील पोलिसांचा धाक कमी झालाय का ? असे एक ना अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कठोर भूमिका घेत गुन्हेगारांना धडा शिकवणे फार महत्वाचे झाले आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.