घराबाहेर उभा होता महावितरण कंपनीचा ठेकेदार, हल्लेखोर आले अन् गोळी झाडून निघून गेले, कारण काय?*

| Updated on: Jun 05, 2023 | 10:19 AM

महवितरण कंपनीचा ठेकेदार घराबाहेर संध्याकाळी उभा होता. अचानक एक गाडी आली अन् पुढे जे झालं त्यानंतर घरच्यांसह शेजारीही हादरले.

घराबाहेर उभा होता महावितरण कंपनीचा ठेकेदार, हल्लेखोर आले अन् गोळी झाडून निघून गेले, कारण काय?*
कल्याणमध्ये महावितरण कंपनीच्या ठेकेदारावर गोळीबार
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : कल्याणच्या टिटवाळामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. घराबाहेर उभ्या असलेल्या महावितरण कंपनीच्या ठेकेदारावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. टिटवाळ्यातील सावरकर नगरी परिसरात घराबाहेर उभा असलेल्या महावितरण कंपनीच्या ठेकेदारावर गोळीबार केल्याची धक्कादाय घटना घडली. या गोळीबारात ठेकेदाराच्या छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ठेकेदाराला जखमी अवस्थेत उपचारासाठी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमेश साळुंखे असे या ठेकेदाराचे नाव आहे. एका काळ्या गाडीतून येऊन हल्लेखोर आणि गोळीबार केला. याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

गोळीबारात ठेकेदार जखमी

कल्याण टिटवाळा सावरकर नगरी परिसरात उमेश साळुंखे हे राहतात. काल सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ते घराबाहेर उभे असताना त्यांच्यावर अचानक गोळीबार करत त्याचा हत्येचा प्रयत्न करण्यात आला. या गोळीबारात एक गोळी त्याच्या छातीत लागल्याने ते खाली पडले. यावेळी हल्लेखोराने तेथून पळ काढला. गोळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि घरातील सदस्य बाहेर धावत आले.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु

जखमी अवस्थेत असलेल्या उमेशला लगेचच जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी डॉक्टरांनी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला मुंबईतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. याप्रकरणी कल्याण तालुका टिटवाळा पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, साळुंखेवर कोणी आणि का गोळी झाडली? याचा तपास पोलीस करत असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा