टोरंटो : कॅनडातील टोरंटोजवळ (Toronto Canada) शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा (Indian students) मृत्यू झाला. हा अपघात (Car Accident) हायवे 401 वर बेलेविले आणि ट्रेंटनजवळ झाला, अशी बातमी सीटीव्ही न्यूज ओटावा या वृत्तसंस्थेने दिली. एकिन्स रोड ते सेंट हिलायर रोड दरम्यान महामार्गावर शनिवारी पहाटे ट्रॅक्टर-ट्रेलर आणि पॅसेंजर व्हॅनची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाची टीम अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या मित्रांच्या संपर्कात आहे, अशी माहिती कॅनडामधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी दिली.
भारतीय विद्यार्थी व्हॅनने प्रवास करत होते. त्यापैकी पाच जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर दोघा विद्यार्थ्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जसपिंदर सिंग (21), करणपाल सिंग (22), मोहित चौहान (23), पवन कुमार (23) आणि हरप्रीत सिंग (24) अशी अपघाता मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. मॉन्ट्रियल आणि ग्रेटर टोरंटो भागात हे विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
5 Indian students passed away in an auto accident near Toronto on Saturday, March 13. Two others in hospital. Team of Consulate General of India in Toronto in touch with friends of the victims for assistance: Ajay Bisaria, High Commissioner of India to Canada
— ANI (@ANI) March 14, 2022
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताचा अधिक तपास सुरु आहे. अपघातानंतर वॉलब्रिज लॉयलिस्ट रोड आणि ग्लेन मिलर रोड दरम्यानच्या लेन 10 तास बंद होत्या. हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ट्रॅक्टर-ट्रेलरचा चालक अपघातात सुखरुप आहे, असं ओंटारियो प्रांतीय पोलिसांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
अमरावतीत काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या गाडीचा अपघात, पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
वर्ध्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, अपघातात लहान मुलाचा समावेश
काळजाचा ठोका चुकवणारी घटना: दौंड तालुक्यात स्कूल बसला अपघात, विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू