औरंगाबाद – मराठवाड्यात (Marathwada) वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील 2 जण तर जालन्यातील (Jalna) 3 जणांचा त्यामध्ये समावेश आहे. मराठवाड्यात पावसाची अवकृपा झाली आहे त्यामध्ये 5 जणांचे बळी गेले आहेत. औरंगाबाद, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यावर्षी मराठवाड्यात अतिपावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावासाने जोरदार सुरूवात केली आहे. त्याचबरोबर वीजांचा कडकडाट सुद्धा पाहायला मिळत आहे.
गुरे चरायला घेऊन गेलेल्या गुराख्याच्या अंगावर वीज पडुन दुर्देवी मृत्यु झाला आहे. तर दोन बालके गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा येथे घडली आहे. पिसाराम चचाने वय 60 वर्ष यांचा जागीचं मृत्यू झाला. तर क्रांतिवीर सुभाष गरपडे वय 12 वर्ष, छकुली राजू नेवारे वय 10 हे दोघे जखमी झाले. पिसाराम गायी चारण्यासाठी तर दोन्ही बालके शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान पावसाला सुरुवात झाली असता पिसाराम व दोन बालकांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. दरम्यान अचानक वीज कोसळल्याने पिसाराम चचाने व दोन्ही बालके गंभीररीत्या भाजली आहेत. तिघांनाही गावकऱ्यांनी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी पिसाराम यांना मृत घोषित केले. तर हिमांशी आणि क्रांतिवीर यांच्यावर प्रथमोपचार करत पुढील उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची माहिती पोलिस व महसूल प्रशासनाला दिली असून पंचनामा केला गेला आहे. पिसराम च्या दुर्देवी मृत्युने गावात शोककळा पसरली आहे.
प्रचंड उकाड्यानंतर शनिवार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह वीज कोसळून एक महिला दगावल्याची घटना भोकरदन तालुक्यातील कोदा येथे घडली. कोदा येथील महिला शेतकरी गंगाबाई पांडूरंग जाधव, मुलगा दत्ता पांडूरंग जाधव, भारती गजानन जाधव हे तिघे शेतातील छपरावर पटी टाकत असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वीज पडल्याने गंगाबाई पांडुरंग जाधव वय (५५) या जागीच ठार झाल्या असून दत्तात्रय जाधव व भारती जाधव हे जखमी झाले आहेत.
त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेस खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.