नागपूरमध्ये ब्रँडेड खाद्य तेलाच्या डब्यातून भेसळयुक्त तेलाची विक्री, प्रशासनाची धडक कारवाई

| Updated on: Feb 12, 2021 | 1:08 AM

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये ब्रँडेड खाद्य तेलाच्या डब्यात भेसळयुक्त तेल भरून विकण्याचा प्रकार समोर आलाय.

नागपूरमध्ये ब्रँडेड खाद्य तेलाच्या डब्यातून भेसळयुक्त तेलाची विक्री, प्रशासनाची धडक कारवाई
तीळ
Follow us on

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये ब्रँडेड खाद्य तेलाच्या डब्यात भेसळयुक्त तेल भरून विकण्याचा प्रकार समोर आलाय. मिळालेल्या गुप्त माहितीवरून नागपुरातील इतवारी बाजारातील 5 व्यापाऱ्यांच्या दुकानांवर अन्न व औषधी प्रशासन विभागाने धाड टाकली. या कारवाईत 3 लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलाय. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे (Food and Drug Administration FDA action against edible oil adulteration in Nagpur).

अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपूरच्या इतवारी ठोक बाजारात खाद्य तेल व्यापाऱ्यांवर कारवाई केल्याने अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 5 व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे आपलाही नंबर लागू शकतो अशी भीती भेसळ करणाऱ्यांना लागलीय. प्रशासनाला हे व्यापारी ब्रँडेड तेलाच्या डब्यात भेसळयुक्त तेल भरून विकतात याबाबत माहिती मिळाली होती. त्याआधारेच ही कारवाई करण्यात आली.

घटनास्थळावर 3 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. त्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. या नमुन्यांच्या रिपोर्टमध्ये भेसळ असल्याचे आढळून आल्यास या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाने दिलीय. अन्न व औषधी प्रशासन विभागाने नागरिकांनाही कुठे अशी भेसळ होत असल्याचं आढळल्यास त्याची माहिती विभागाला देण्याचं आवाहन केलंय.

हेही वाचा :

गृहिणींचं बजेट कोलमडलं, सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे भाव कडाडले

Healthy Cooking Oil | जेवणासाठी कोणते खाद्य तेल सुरक्षित? वाचा खाद्यतेलांचे फायदे-तोटे

फ्लिपकार्टवर फक्त एक रुपयात किराणा सामान खरेदी करा

व्हिडीओ पाहा :

Food and Drug Administration FDA action against edible oil adulteration in Nagpur