कोल्हापूर शिंदे कुटुंबीय आत्महत्या प्रकरण, माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याला अटक

| Updated on: Jun 26, 2023 | 2:41 PM

खोट्या आरोपामुळे कोल्हापुरमधील गडहिंग्लज येथे एका उद्योगपतीने कुटुंबासह जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी न्यायालयाने आज आरोपींंना शिक्षा सुनावली.

कोल्हापूर शिंदे कुटुंबीय आत्महत्या प्रकरण, माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याला अटक
शिंदे कुटुंबीयांच्या आत्महत्येप्रकरणी माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याला अटक
Image Credit source: TV9
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधील अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. संतोष शिंदे यांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेसह तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या प्रियकराला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केलीय. आणखी दोघांचा अद्याप शोध सुरु आहे. दरम्यान, संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणात नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर आल्यान संताप व्यक्त होतोय. दरम्यान ही घटना घडल्यापासून शुभदा पाटील आणि राहुल राऊत हे दोघेही फरार होते. रविवारी रात्री गडहिंग्लज पोलिसांनी त्यांना सोलापूरमधून अटक केली. आज न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात खाद्यतेल, बेकरी उत्पादनात नामांकित समूह असलेल्या अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी शुक्रवारी रात्री आपल्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली. आधी विषारी औषध प्राशन करून त्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून शिंदे यांनी आपल्यासह पत्नी आणि मुलाचे जीवन संपवलं. शनिवारी सकाळी शिंदे यांच्या बेडरूमचा दरवाजा उशिरापर्यंत न उघडल्यामुळे धक्कादायक प्रकार समोर आला.

माजी नगरसेविकेच्या खोट्या आरोपामुळे तणावात होते

संतोष शिंदे यांच्यावर गडहिंग्लजमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभदा पाटील यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यासंदर्भात कर्नाटकातील संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. याच गुन्ह्यात संतोष शिंदे यांना महिन्याभरापूर्वी जेलवारी देखील करावी लागली होती. या सगळ्या प्रकारानंतर संतोष शिंदे हे मोठ्या मानसिक तणावात होते. जेलमधून आल्यानंतर पुन्हा आपला व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत असताना शिंदे यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

सुसाईड नोटमध्ये आरोपींच्या नावांचा उल्लेख

आपलं लहानपण हलाकीत काढलेल्या संतोष शिंदे यांनी मोठ्या कष्टाने अर्जुन उद्योग समूह उभा केला आहे. आज तीनशे ते चारशे कुटुंबाचा आधार ते बनले होते. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही त्यांनी आपला व्यवसाय मोठ्या जिद्दीने वाढवला. अशातच मैत्रीपूर्ण संबंधातून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शुभदा पाटील यांनी बलात्काराचा आरोप केल्यामुळे गडहिंग्लज सह परिसरातच खळबळ उडाली होती. संतोष शिंदे यांनी देखील आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शुभदा पाटील आणि तिचा पोलीस मित्र राहुल राऊत, विशाल बाणेकर आणि संतोष पाटील हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा उल्लेख करत, या चौघांनाच आपल्या मृत्यूला दोषी धराव असं म्हटलं आहे.

माजी नगरसेविकेविरोधात नागरिकांमध्ये संताप

संतोष शिंदे यांच्या आत्महत्येनंतर गडहिंग्लज सह परिसरात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शुभदा पाटील यांच्या विरोधात मोठा संताप व्यक्त होतोय. शिंदे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या तसेच शिंदे कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पाटील यांच्यावर कडक कारवाईची मागणी देखील आता होऊ लागली आहे.

आज गडहिंग्लजमधील शिष्टमंडळाने कोल्हापुरात आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमावा अशी मागणी शिष्टमंडळातील शिंदे यांचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी केली आहे. याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भातील सूचना देणार असल्याचं आश्वस्त केलंय.