नवी दिल्ली – माजी मंत्र्याच्या (Former minister’s son) मुलाने सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून एका महिलेशी ओळख केली. त्यानंतर महिलेशी गोड बोलून बलात्कार केला. या प्रकरणाची कुठेही वाच्यता करु नये, म्हणून मारहाण सुध्दा केली असल्याची तक्रार पोलिस (police) स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी महिलेची आरोग्य चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर माजी मंत्र्याच्या मुलाला सुध्दा अटक करण्याची पोलिसांनी तयारी केली असल्याची जाहीर केली आहे.
माजी मंत्री दिनेश धनै यांचा मुलगा आणि उत्तराखंड जन एकता पार्टीचा नेता कनक धनै या दोघांच्या विरोधात एका लग्न झालेल्या महिलेने बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार घेतली असून लवकरचं आरोपीला अटक होण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात आली आहे.
महिलेची आणि मंत्र्याचा मुलगा कनैक धनै यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर त्यांची भेट डेहराडून येथे झाली. त्यावेळी कनैक धनै यांनी महिलेवरती बलात्कार केला. त्यानंतर कनैक धनै याने महिलेचा नंबर ब्लॉक केला. टेन्शनमध्ये आलेल्या महिलेला आत्महत्या करावीशी वाटत होती.
13 जानेवारीला मंत्र्याच्या मुलाने पुन्हा ज्यावेळी मारहाण केली, त्यावेळी महिलेने जवळचं पोलिस स्टेशन गाठलं असल्याच तक्रारीत म्हटलं आहे.