स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक, लोन काऊन्सिलरनेच घातला ‘इतक्या’ करोडोंचा गंडा

| Updated on: Feb 16, 2023 | 12:38 PM

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विद्यापीठ रोड शाखा आणि टिळक रोड शाखेत 2017 ते 2019 या काळात मंजूर करण्यात आलेली 46 वाहन कर्ज प्रकरणे संशयित असल्याचे ऑडिटमध्ये समोर झाले होते.

स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक, लोन काऊन्सिलरनेच घातला इतक्या करोडोंचा गंडा
नोकरीचे आमिष दाखवत तरुणांना गंडा
Follow us on

पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : बँकेचे ॲटो लोन कौन्सिलरनेच स्टेट बँक ऑफ इंडियाला 47 कोटींचा चुना लावल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पुण्यातील विद्यापीठ रोड शाखा आणि टिळक रोड शाखेत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बँकेचा लोन काऊन्सिलर आदित्य नंदकुमार शेठिया याच्यासह दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे आदित्यने आपल्या साथीदारांसह मिळून बँकेला गंडा घातला. वर्ष 2017 ते 2019 दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपींनी आणखी कुठल्या बँकेला गंडा घातला आहे का याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत.

पुण्यातील बँकेच्या दोन शाखेत अपहार

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विद्यापीठ रोड शाखा आणि टिळक रोड शाखेत 2017 ते 2019 या काळात मंजूर करण्यात आलेली 46 वाहन कर्ज प्रकरणे संशयित असल्याचे ऑडिटमध्ये समोर झाले होते.

वाहन कर्ज काऊन्सिलरने लावला चुना

हे वाहन कर्ज करून देणारे बँकेचे ॲटो लोन काऊन्सिलर आदित्यने त्याच्या इतर साथीदारांसोबत मिळून बँकेची फसवणूक केली. बनावट कोटेशन टॅक्स इन्व्हाईस मार्जिन आणि फुल पेमेंटच्या रिसीट प्रत बनवून ते खरे असल्याचे भासवले.

हे सुद्धा वाचा

47 कोटी 65 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक

त्याने बँकेतून महागड्या गाड्यांसाठी मोठ्या रकमेचे वाहन कर्ज मंजूर करून घेतले. त्यातील काही प्रकरणात सुरुवातीला इतर खात्यावर रक्कम वळती केली. नंतर संबंधित वाहन कर्जदार यांच्या नावावर ही रक्कम वर्ग करत बँकेची 47 कोटी 65 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक केली.