डोंबिवली स्टेशन परिसरात महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पाहा VIDEO

| Updated on: Sep 05, 2023 | 9:39 PM

डोंबिवली स्टेशन परिसरात दोन फेरीवाला महिलांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तब्बल 25 मिनिटे स्टेशन परिसरात महिलांचा तमाशा सुरू होता.

डोंबिवली स्टेशन परिसरात महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पाहा VIDEO
Follow us on

डोंबिवली | 5 सप्टेंबर 2023 : डोंबिवली स्टेशन बाहेर पुन्हा एकदा फेरीवाले बसायाला सुरवात झाली आहे. रेल्वे स्टेशनपासून 150 मीटर परिसरात फेरीवाले बसू देऊ नये, असा कोर्टाचा आदेश असून सुद्धा महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. यामुळे फेरीवाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही. ते खुलेआम स्टेशन परिसरात ग्राहकासोबत दबंगगिरी करतात. त्यांच्या दादागिरीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहे.

विशेष म्हणजे आता तक चक्क रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यासमोरच भर रस्त्यात दोन फेरीवाले महिलांमध्ये फ्री स्टाईलने हाणामारी झाली. तब्बल 25 मिनिटे हा तमाशा स्टेशन परिसरात सुरू होता. अखेर नागरिकांनी मध्यस्थी करत हे प्रकरण सोडवले. तरी पालिका प्रशासन आणि पोलीस कधी लक्ष देणार? असा सवाल आता नागरिक करु लागेल आहेत.

कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. रोज काहीना काही घटना घडत असते. डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या दादागिरीचा तर कधी एखाद्या रिक्षावाल्याच्या दादागिरीचा प्रकार सातत्याने समोर येत असतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत पोलिसांनी काहीतरी ठोस पाऊल उचलणं महत्त्वाचं असल्याचं मत नागरिकांचं आहे.