बदलापुरात मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग, संतापलेल्या पतीने मग ‘बदला’ घेतलाच…

| Updated on: Jan 14, 2025 | 3:33 PM

बदलापूरात एक अनोखा 'बदला' घेण्यात आला आहे. या ठिकाणी मित्राने मित्राचा विश्वासघात केल्याचे उघड झाल्याने अखेर मित्रानेच मित्राचा काटा काढत आपला 'बदला' पूर्ण केला आहे.

बदलापुरात मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग, संतापलेल्या पतीने मग बदला घेतलाच...
Follow us on

ते दोघे जण अल्पावधीत एकमेकांचे मित्र झाले. या मित्राची वाईट नजर त्याच्या पत्नीवर होती. परंतू मैत्रीत आंधळ्या झालेल्या मित्राला हे समजलंच नाही. यानंतर अतिविश्वासाचा गैरफायदा घेऊन त्या वासनाधंत मित्राने अखेर आपले इप्सित साध्य केलेच त्याने मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर मित्राच्या बायकोला कोणाला सांगितले तर तूझे कूंकु पुसलेच म्हणून समज अशी धमकी दिली. त्यानंतर या वासनाधंत मित्राचे रोज घरी येणे सुरु झाले. अखेर धाडस करुन नराधम मित्रांच्या पत्नीने अखेर पतीकडे तक्रार केलीच….

बदलापूरात एका नराधमाने त्याचा मित्राचा विश्वासघात केला. आपल्या मित्राच्या पत्नीवरच त्याची वाईट नजर होती. अखेर डाव साधून त्याने मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर त्याने ही बाब पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने आपल्या पतीला याबाबतची माहिती दिली. यानंतर पतीने आपल्या विश्वास घात करणाऱ्या मित्राचा बदला घेण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याने त्याच्या मित्राला गोड बोलून त्याला जाणवू दिले नाही. काही घडलेच नाही असे वातावरण त्याने तयार केले. त्यानंतर त्याने एक योजना आखली.

बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती. मात्र सुशांत याने नरेशच्या पत्नीवर डोळा ठेवत तिचा वारंवार विनयभंग केला. त्याचा रोजचा त्रास पाहून तिने अखेर जीवावर उदार होऊन हिंमत करून आपला पती नरेश याच्या कानावर सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली. यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत १० जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावले. तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं. त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामास राहिला. पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली आणि अति दारू प्यायल्याने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

पोलीसी खाक्या दाखवताच

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र ज्यावेळेस सुशांत याच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले, त्यावेळेस नरेश याची पोलखोल झाली. कारण सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते. यानंतर पोलीसांनी नरेश याला ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपणच सुशांतची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. आपल्या पत्नीसोबत दुष्कृत्य केल्याच्या रागातून त्याने सुशांतला ठार केल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या.