शिरडी – गॅस टँकरमधून (gas truck) बेकायदेशीर गॅस सिलेंडर (Cylinder) भरणाऱ्या टोळी पोलिसांनी (Shirdi Police) रंगेहाथ ताब्यात घेतली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाने कोपरगावात ही मोठी कारवाई केली असल्याची माहि्ती मिळाली आहे. कोपरगाव परिसरात यूपी, हरियाणा, राजस्थानी ढाब्याच्या समोर रात्री ही कारवाई करण्यात आलीय. झालेल्या कारवाईत टँकर, गॅस सिलेंडर , रोख रकमेसह गॅस सिलेंडर भरण्याचे साहित्य असं एकूण जवळपास 28 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
ज्यावेळी कारवाई करण्यात आली, त्यावेळी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. पोलिसांना असा प्रकार होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या चौघांची कसून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ताब्यात घेतलेल्या चौघांकडून इतरांची नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच हा प्रकार कधीपासून सुरु आहे, याची सुद्धा माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.