सातारा : शिक्षणक्षेत्राचा अफाट असा विस्तार झाला आहे. वाढत्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी (Students) तग धरावी, विद्यार्थ्यांनीही जगातील स्पर्धेशी सामना करावा म्हणून खासगी शिकवणी, महागड्या शाळा यांची रेलचेल सुरु आहे. लाखो रुपयांचे डोनेशन देऊनही अनेकांना काही शाळांमंध्ये प्रवेश मिळत नाही. शाळेतील (School) अभ्यासाचे ओझेही काही विद्यार्थ्यांना झेपेनासे झाले आहे. तशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. साताऱ्यात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका विद्यार्थिनीने सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला कंटाळून चक्क आत्महत्या (Suicide) केलीय. गळफास घेऊन तिने स्वत:ला संपवलंय. आत्महत्या करण्याआधी तिने एक चिठ्ठी लिहलीय. या चिठ्ठीत सेमी इंग्रजीमधून अभ्यास नको म्हणून आत्महत्या करत असल्याचं विद्यार्थिनीने म्हटलंय.
मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील शाहूपुरी येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.. “सेमी इंग्लिश मीडियम नको” म्हणून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे. विद्यार्थिनीने आत्महत्या केलेल्या ठिकाणी शाहूपुरी पोलिसांना एक चिट्ठी आढळून आलीय. त्यामध्ये कोणालाही जबाबदार धरू नये असा उल्लेख करत ‘सेमी इंग्लिश मिडीयम नको’ असल्याने मी आत्महत्या करत असल्याचे विद्यार्थिनीने लिहले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेने सातारा शहर परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी तिने पंख्याला गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसर हादरून गेला आहे.
दरम्यान, 25 जानेवारी रोजी मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेला असलेल्या रामवाडी भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका 21 वर्षांच्या तरुणीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. मृत्यूआधी तिनं सुसाईड नोट लिहिली होती. आपला मोबाईलचा पासवर्ड तिनं सुसाईड नोटमध्ये सांगितला असून तिच्या आत्महत्येची नोट वाचून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
इतर बातम्या :