5 कोटी द्या, नाही तर लैंगिक छळ… बड्या नेत्याच्या भावाला कुणी दिली धमकी?

| Updated on: Jun 22, 2024 | 4:57 PM

माजी खासदार प्रज्वल रेवन्ना हे लैंगिक छळ प्रकरणामुळे आधीच चर्चेत आहे. यातच आता त्यांचे आमदार बंधू सुरज रेवन्ना यांच्यासोबत ब्लॅकमेलिंग केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

5 कोटी द्या, नाही तर लैंगिक छळ... बड्या नेत्याच्या भावाला कुणी दिली धमकी?
Prajwal Revanna
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

कर्नाटकातील सेक्स स्कँडलमध्ये सहभागी जेडीएस नेता प्रज्वल रेवन्ना यांचा भाऊ आमदार सूरज रेवन्ना यांना लैंगिक छळाच्या खोट्या आरोपांवरून ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हसन जिल्हा पोलिसांनी याप्रकरणी दोन ब्लॅकमेलिंग आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आमदार सूरज यांची बदनामी न करण्याच्या बदल्यात 5 कोटी इतकी खंडणी मागितली आहे असेही सूरज आणि त्याचा मित्र शिवकुमार यांनी ही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांचा सामना करत असलेले माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 24 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

माजी खासदार प्रज्वल रेवन्ना हे लैंगिक छळ प्रकरणामुळे आधीच चर्चेत आहे. यातच आता त्यांचे आमदार बंधू सुरज रेवन्ना यांच्यासोबत ब्लॅकमेलिंग केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन याने आमदार सुरज यांचा मित्र शिवकुमार यांच्यासोबत मैत्री केली. आपली आर्थिक चणचण आहे. त्यामुळे नोकरी मिळवून देण्यासाठी आमदार सुरज यांनी मदत करण्याची विनंती त्याने शिवकुमार याला केली. चेतनला मदत करण्यासाठी शिवकुमार याने आमदार सुरज याला विनंती केली.

लोकसभा निवडणुकीवेळी शिवकुमार याने चेतनला आमदार सूरज रेवण्णा यांच्यासोबत ओळख करून देण्याचे मान्य केले. शिवकुमार याने त्या दोघांची भेट घडवून आणली. मात्र, 17 जून रोजी चेतनने शिवकुमारला फोन केला आणि सूरज रेवण्णा याच्या फार्महाऊसवर जाब विचारण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला नोकरीसाठी नकार मिळाला. यानंतर चेतन याने रेवन्ना आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याची धमकी फोनवरून दिली. तसेच, 5 कोटी रुपये न दिल्यास लैंगिक छळाचा आरोप करणारी पोलिस तक्रार दाखल करू अशीही धमकी दिली.

खंडणीच्या या फोननंतर शिवकुमारला सतत चेतन याला ब्लॅकमेल करत होता. दरम्यान, त्याने 5 कोटींची मागणी तीन कोटींवर आणली. ते दोघे बधत नसल्याचे पाहून अखेर, अडीच कोटींची मागणी करण्यात आली. चेतन आणि त्याचा मेहुणा हे दोघेही त्यानंतर आमदार सुरज आणि शिवकुमार यांना फोन करून त्रास देऊ लागले. 19 जून रोजी चेतनने शिवकुमारला पुन्हा फोन करून पैसे न दिल्यास रेवण्णाच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर, सुरज आणि शिवकुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.