नाशिकच्या पोलीस अधिक्षकांचा नवा फंडा, आता अवैध धंदे बंदच… तक्रारीसाठी आता हेल्पलाइन नंबर

| Updated on: Nov 25, 2022 | 3:10 PM

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्याच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिला आहे.

नाशिकच्या पोलीस अधिक्षकांचा नवा फंडा, आता अवैध धंदे बंदच... तक्रारीसाठी आता हेल्पलाइन नंबर
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिक पोलीस अधिक्षक पदी शहाजी उमाप यांनी पदभार घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांना रडारवर घेतले आहे. ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अवैध धंदे सुरू होते. स्थानिक नागरिकांनी तक्रारी करून तालुकास्तरावरील अधिकारी जुमानत नव्हते. त्यामुळे आता नव्याने पोलीस अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारलेले शहाजी उमाप यांनी संपूर्ण जिल्ह्यातील चित्र बदलले आहे. ग्रामीण भागातील जवळपास सर्वच अवैध धंदे बंद झाल्याचे चित्र आहे. अवैध दारू विक्री, जुगार आणि मटके बंद झाल्याने अचानक बदलेले चित्र पाहून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यात रात्री दहा नंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद केली जात आहे. ग्रामीण भागात शिस्त लावण्याचे काम पोलीस अधिक्षकांनी हाती घेतले आहे. त्यातच अवैध प्रकारचे धंदे दिसून आल्यास नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्याच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिला आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीतील 40 आणि शहर परिसराला लागून असलेल्या 10 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना ही तक्रार करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

6262256363 हा नंबर उपलब्ध करून दिला आहे. ह्या नंबर कोणीही अवैध धंद्याच्या संदर्भात तक्रार करू शकणार आहे, त्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

ठरवून दिलेले पन्नास पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास तक्रार केल्यास तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी म्हंटले आहे.

हेल्पलाइन नंबर जाहीर करत असतांना तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याने तक्रारी प्राप्त होण्यास आणि कारवाई करण्यास अधिक सोपे होणार आहे.

अवैध बंद करण्याची मोहीम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले जात आहे.