पणजी | 12 जानेवारी 2024 : एका बड्या कंपनीची सीईओ असलेल्या सूचना सेठने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याने संपूर्ण गोवा हादरलं. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला. या हत्या प्रकरणात आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. याबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. सूचनाचा लहान मुलगा हा तिच्या (माजी) पतीसारखा दिसायचा. त्याला पाहून मला पतीची आठवण येते, आमच्या तुटलेल्या नात्याची आठवण येते, असं सूचनाने तिच्या कुटुंबियांशी बोलताना सांगितलं होतं.
पतीसोबत वेगळ झाल्यानतंर कोर्टाने सूचनाचा पती रमण याला त्याच्या मुलाला आठवड्यातून एकदा भेटायची परवानगी दिली होती. मात्र सूचनाला हे फारसं आवडलेलं नव्हतं.मुलाची आणि पतीची भेट होऊ नय म्हणूनच ती त्याला गोव्याला घेऊन गेली होती, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र तिथे गेल्यानंतर तिने मुलाचं आयुष्यच संपवलं.
पतीला फोन करून भेटायला बोलावलं
पोलिसांच्या सांगण्यानुसार, सूचनाने तिच्या पतीला फोन केला होता आणि कोर्टाच्या आदेशप्रमाणे तू रविवारी मुलाला भेटायला येऊ शकतोस असं सांगितलं होतं. रमणने तिला मुलासोबत घरी यायला सांगितलं. पण ती सार्वजनिक ठिकाणी भेटण्यावरच ठाम होती.
रमणने दोन तास वाट पाहिली पण
त्यानंतर सूचनाने सांगितलेल्या जागी रमण मुलाला भेटण्यासाठी गेला. तो दोन तास वाट बघत होता. पण ती आली नाही, तेव्हा रमणने तिला फोन, मेसेजेस, मेल सगळं काही केलं पण सूचनाने काहीच रिप्लाय दिला नाही. अखेर तो तिथून निघाला आणि त्यानंतर तो कामासाठी जकार्ताला गेला. त्यानंतर त्याला अचानक मुलाच्या हत्येचीच बातमी समजली. पतीची मुलासोबत भेट होऊ नये म्हणूनच सूचना मुलासोबत गोव्याला गेली होती, अशी माहिती नंतर समोर आली.
गोव्यात गेल्यावर सूचना मुलासोबत फिरली. आणि नंतर ७ जानेवारीला तिने तिच्या पोटच्याच लेकाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून टॅक्सीत बसून बंगळूरूच्या दिशेने निघाी. मात्र ती ज्या हॉटेलमध्ये राहिली होती, त्या स्टाफला संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला फोन करून गाडी पोलिस स्टेसनला नेण्यास सांगितली. तेथे बॅगमध्ये मुलाचा मृतदेह दिसल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आणि या हत्याकांडाचा खुलासा झाला.