मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या बऱ्याच घटना उघडकीस येत असतात. असच एक प्रकार नुकताच उघडकीस आला असून मुंबई कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ₹ 13 कोटींहून अधिक किमतीचं सोन जप्त केलं आहे. अधिकाऱ्यांनी 20.18 किलो पेक्षा जास्त सोने आणि 4.98 किलो गांजा आणि ₹ 0.96 कोटी किमतीचे फॉरेक्स जप्त केले. याप्रकरणी कस्टम्स विभागाकडून
७ जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे तस्करी करणाऱ्यांनी पुठ्ठ्याचे बॉक्स तसेच कपड्यांमध्ये आणि प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोनं आणल्याचं उघड झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 15-27 जुलै, 2024 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. विमानतळ आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन-III च्या अधिकाऱ्यांनी 13.11 कोटी मूल्याचे 20.18 किलो सोने, 4.98 किलो गांजा आणि परदेशी चलन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या गांजा आणि परदेशी चलनाची किंमत १ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समजते. तस्करी करणाऱ्या प्रवाशांनी पुठ्ठ्याचे बॉक्स तसेच कपडे आणि गुदद्वारातून सोन्याची तस्करी केली.
यापूर्वी जूनच्या सुरुवातीला, मुंबई कस्टम्सने मुंबईच्या तळोजा परिसरातून सिगारेट, ई-सिगारेट आणि तंबाखू/गुटखा यासह ₹ 10 कोटींहून अधिक किमतीचा निषिद्ध पदार्थ जप्त केला होता, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.