दोन ट्रकची धडक, एका ट्रकने मारली पलटी, पहाटेची वेळ असल्यामुळे…

| Updated on: Jun 03, 2023 | 10:17 AM

कत्तलखान्यात जनावरे नेणाऱ्या ट्रकची धान्य वाहून नेणाऱ्या ट्रकला जोराची धडक बसली. संपुर्ण घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. पहाटेची वेळ असल्याने जीवितहानी टळली आहे. त्याचबरोबर दोन्ही ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे.

दोन ट्रकची धडक, एका ट्रकने मारली पलटी, पहाटेची वेळ असल्यामुळे...
TRUCK
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon) तालुक्यातील नवेगावबांध टी पॉईन्ट, शिवाजी चौकात छत्तीसगड मधून चिचगड नवेगावबांध सानगडी मार्गे नागपूरला जनावरे भरून भरधाव वेगात ट्रक जात होता, त्याचवेळेस अर्जुनी-मोर- नवेगावबांध-कोहमारा या हायवेवर अर्जुनी-मोरकडून कोहमारा मार्गे आमगावला धान्य घेऊन ट्रक निघाला होता. त्यावेळी दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक (truck accident) झाली. हा संपूर्ण अपघात सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहने कमी होती. त्यामुळे जीवीतहाणी झाली नाही.

ज्यावेळी दोन्ही ट्रकची धडक झाली, त्यावेळी त्या रस्त्यावर आजूबाजूला कसल्याही प्रकारचं वाहनं नव्हतं. त्यामुळे कसल्याही प्रकारची जीवीतहाणी झाली नाही, अन्यथा मोठा अपघात झाला असता. दोन्ही ट्रक इतक्या जोरात धडकले की, धान्याचा ट्रक जागीचं पलटला. एक ट्रकमध्ये जनावर होती. तर एका ट्रकमध्ये धान्य होतं. धान्य असलेला ट्रक पलटी झाला आहे. विशेष म्हणजे ही सगळी घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा गुन्हा नवेगावबांध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

ज्या ट्रकमध्ये जनावर भरली होती, त्या ट्रकमधील सर्व जनावरं साकोली येथील गोशाळेत पाठवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर पलटी झालेल्या ट्रकमधील धान्य दुसऱ्या ठिकाणी गा़डीने हलवण्यात येणार आहे. पोलिसांनी दोन्ही चालकांवरती गुन्हा दाखल केला असून अपघात कशामुळे झाला याची सुध्दा कसून चौकशी करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

जनावर कत्तलीसाठी नेत असल्याचं कारण पोलिसांनी समजल्यापासून पोलिस तपासाची चक्र अधिक फिरवली आहे. त्याचबरोबर याचा मुख्यसुत्रधार कोण आहे ? त्याचा सुध्दा पोलिस शोध घेणार आहेत.