गोंदिया : पदवीधर शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदियात समोर आली आहे. सुनील मुटकुरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. मुटकुरेंच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Gondia ZP Teacher commits Suicide hangs self at home)
समाज मग तो कालचा असेल, आजचा असेल किंवा उद्याचा असेल, या समाजाचा खरा शिल्पकार हा ‘शिक्षक’च असतो. शिक्षक वर्ग हा समाजासाठी दिशादर्शकाचे काम करणारा प्रमुख मार्गदर्शक आहे. पण हा दिशादर्शकच खचून जाऊन जीवाबद्दल टोकाची भूमिका घेत असेल तर ! अशीच घटना गोंदिया जिल्हातील आमगाव येथे घडली.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
जिल्हा परिषद शाळा बोरकन्हार येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक सुनील मुटकुरे यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पण मुटकुरे हे एकाकी स्वभावाचे होते, ते सहसा इतरात मिसळत नव्हते, असं बोललं जातं. मुटकुरे इंग्रजी विषयात निपुण होते, तसेच झाडांवर कलम करण्यात त्यांचा हातखंडा होता.
सुनील मुटकुरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आमगाव पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत.
जळगावात सलून व्यावसायिकाची आत्महत्या
दुसरीकडे, लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यानंतर जळगावातील सलून व्यावसायिकानेही टोकाचं पाऊल उचललं. कर्जबाजारी झाल्यामुळे 35 वर्षीय गजानन कडु वाघ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलांवरील छत्र हरपलं आहे.
कर्जाचा बोजा वाढल्याने टोकाचं पाऊल
पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे दुकाने बंद पडली. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. सुरुवातीच्या काळात सलून दुकानदारांकडून काही प्रमाणात मदत मिळाली. मात्र लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली होती. गजानन यांनी अखेर उसनवारी करुन घरखर्च भागवण्यास सुरुवात केली. मात्र डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत गेल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प, आर्थिक तंगीला कंटाळून चंद्रपूरमध्ये सलून चालकाची आत्महत्या
सलून व्यावसायिकाचा राहत्या घरी गळफास, दोन चिमुरड्यांवरील पितृछत्र हरपलं
(Gondia ZP Teacher commits Suicide hangs self at home)