Ulhasnagar : गुंडाने पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून कापला वाढदिवसाचा केक, केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

| Updated on: Aug 21, 2022 | 3:28 PM

हत्येच्या प्रकरणात कारागृहात असलेल्या रोशन झा या उल्हासनगरमधील गुंडाने पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून केक कापत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आलाय.

Ulhasnagar : गुंडाने पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून कापला वाढदिवसाचा केक, केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Thane : गुंडाने पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून कापला वाढदिवसाचा केक, केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Image Credit source: tv9marathi
Follow us on

ठाणे : हत्येच्या आरोपात जेलमध्ये असलेल्या गुंडाचा प्रताप व्हिडीओच्या (Video) माध्यामातून उघडकीस आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या (Police) कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुंडाला कोर्टात आणलं असताना समर्थकांनी केक आणला होता अशी माहिती मिळाली आहे. केक कापत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरती (Social Media) प्रचंड व्हायरल झाला असून नागरिकांनी पोलिसांच्यावरती टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करावी असा देखील नाराजीचा सूर नागरिक व्यक्त करीत आहे.

नेमकं काय प्रकरण आहे

हत्येच्या प्रकरणात कारागृहात असलेल्या रोशन झा या उल्हासनगरमधील गुंडाने पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून केक कापत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आलाय. केक कापतानाचा त्याचा व्हिडीओ त्याच्याच समर्थकांनी आपल्या व्हॉट्सऍप स्टेटसवर ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांच्या स्टेट्सवरती केक कापतानाचा व्हिडीओ असल्यामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

हे सुद्धा वाचा

जाणून घ्या गुंडाची पार्श्वभूमी

रोशन झा हा उल्हासनगरमधील गुंड असून त्याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकावणे आणि इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी या गुंडाला कारागृहातून कल्याण न्यायालयात आणण्यात आलं होतं. तो पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेला असताना त्याच्या समर्थकांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणला. गुंड रोशन झा याने पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून हातात हातकडी असतानाही खिडकीतून हात बाहेर काढून हा केक कापला. यावेळी व्हॅनमध्ये असलेल्या पोलिसांनी त्याला कोणताही मज्जाव केला नाही. केक कापतानाचा हा व्हिडिओ या गुंडाच्या समर्थकांनी व्हॉट्सऍप स्टेटसला ठेवल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आणि मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात आता संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.