नाशिक : गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात पोलीस विभागाने महसूल विभागाला मागे टाकत दादाचं नंबर वन असल्याचे सिद्ध केले आहे. नाशिक विभागाची लाचखोरीची समोर आलेली आकडेवारी घक्कादायक आहे. यामध्ये महसूल विभागाला मागे टाकत पोलीस कर्मचाऱ्यांनी चिरिमिरीत नंबर वन असल्याचे आकडेवारीतून दाखवून दिले आहे. त्यात विशेष बाब म्हणजे राज्यात लाच घेण्याच्या बाबतीत नाशिक विभाग नंबर दोन वर आहे. लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांच्या सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यास लाचखोर व्यक्तींच्या मुसक्या आवळल्या जातात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचत ही कारवाई केली जात असते. अशाच कारवायांमध्ये काही वर्षांपूर्वी महसूल विभाग अग्रस्थानी होता पण मागील वर्षभरात पोलीस विभाग अग्रस्थानी आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कामगिरी केली आहे. शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंत एसीबीच्या जाळ्यात सापडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकताच जनजागृती सप्ताह साजरा केला आहे. यामध्ये नागरिकांना जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.
समोर आलेल्या आकडेवारीत नोव्हेंबरच्या पर्यन्त सर्वाधिक कारवाई या वर्षभरात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
या वर्षात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यंदाच्या वर्षी नाशिक विभागात तक्रारीनुसार 107 सापळे यशस्वी झाले आहे.
लाचखोरीमध्ये पुण्यानंतर नाशिक विभाग दुसऱ्या स्थानावर आहे. पुणे एसीबीने या वर्षात आतापर्यंत 134 गुन्हे दाखल केले आहेत.
तर नाशिक विभागाने 107 सापळे रचून यशस्वी पणे अंमलात आणले. असून त्यासाठी पाच पथके कार्यरत असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिली आहे.
लाच घेणे आणि देणे दोन्ही गुन्हा असल्याची जनजागृती वारंवार लोकांमध्ये करण्यात येत आहे. भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी एसीबीकडे 1064 हा विशेष टोल फ्री क्रमांक आहे. णाले.
एसीबीने नाशिक जिल्ह्यात 39, जळगावमध्ये 24, धुळ्यात 15, अहमदनगरमध्ये 21 आणि नंदुरबारमध्ये 8 सापळ्यांवर कारवाई केली आहे.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या 39 प्रकरणांपैकी सर्वाधिक नऊ प्रकरणे पोलिस विभागाशी संबंधित आहेत,ज्यात 13 पोलिस कर्मचाऱ्यांना एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.