मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी भर दुपारी एका बंगल्यात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला (Crime News) पकडले आहे. मालेगाव येथील कलेक्टर पट्टा परिसर हा उच्चभ्रू वसाहतीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात बहुतांश नागरिक हे व्यापारी आहेत. दुपारच्या वेळेला दुपारी महिला असतील यांनी त्यांची लूट करता येईल या उद्देशाने आलेल्या दरोडेखोराला नागरिकांनी आरडाओरड करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला होता, तरीही दरोडेखोराने पळवून न जाता महिलांना बंदुकीचा धाक दाखवत दागिने आणि पैसे काढून देण्याची मागणी करत होता. जवळूनच जाणाऱ्या नाशिकच्या पालकमंत्र्यांना ही बाब कळली, त्यांनी तात्काळ बंगल्यात शिरून दरोडेखोराला पकडत पोलीसांच्या हवाली केले आहे. मंत्री दादा भुसे यांनी यापूर्वीही अनेकदा थेट जुगार अड्ड्यावर छापे टाकत पोलीसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकच्या इगतपुरी, सिन्नर येथील दरोडयाच्या घटना ताज्या असताना मालेगाव येथील ही धक्कादायक घटना चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यातच स्वतः जिल्ह्याच्या पळकमंत्र्यांनी दरोडेखोराला पकडत पोलीसांच्या हवाली केल्याने पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मालेगाव शहरातील वाढती गुन्हेगारी ही पोलीसांच्या कामगिरीचे अपयश असल्याची चर्चा सुरू असून भुसे यांनी पकडलेल्या दरोडेखोरांची चर्चा होत आहे.
एखाद्या राजकीय नेत्याला जर दरोडेखोर सापडू शकतात, दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतः जाऊन कारवाई करावी लागते तर मग पोलीस काय करताय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
मालेगाव येथील याच परिसरात गेल्या आठवड्यात एक चारचाकी वाहन चोरी झाले होते, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी अशा घटना वारंवार घडत आहे.
अशी बाब असली तरी दुसरीकडे स्वतः पालकमंत्री हे पोलिसांना सूचना करुन कारवाई करायला लावू शकतात, स्वतःचा जीव धोक्यात घालून कारवाई करण्याची हिंमत दाखवतात त्यामुळे दादा भुसे यांचा पोलिसांवर पालकमंत्री म्हणून वचक नाही का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.