अहमदाबादः गुजरातमधील आनंद रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी मुंबईकडे जाणाऱ्या सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची महिलेला धडक बसल्याने महिला जागीच ठार झाली. ही महिला 54 वर्षाची होती. या अपघातासंदर्भात रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली आहे की, बिट्रिस आर्चीबाल्ड पीटर असे या अपघातात ठार झालेल्या मृत्यू महिलेचे नाव आहे. दुपारी 4.37 वाजता हा अपघात झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वे जात असतानाच महिला रुळ ओलांडत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
ही रेल्वे गांधीनगर कॅपिटल स्टेशनवरून मुंबई सेंट्रलकडे जात असतानाच आनंदमध्ये ट्रेनचा थांबा नसल्याने ट्रेन तशीच पुढे गेली होती.
त्यावेळी महिला रेल्वे रुळ ओलांडत होती. त्याआधी एक दिवस आधी वंदे भारत ट्रेनवर दगडफेकही झाली होती.एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी निवडणूक प्रचारासाठी आले असताना ही दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. गेल्या महिनाभरात या रेल्वेची ही तिसरी धडक आहे, त्याआधी जनारवरांना धडक बसून गुरे दगावली होती.
मागील महिनाभरात रेल्वेची धडक बसून रुळांवर गुरे दगावल्याची ही तिसरी घटना घडली आहे. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता गुजरातमधील वलसाड येथील अतुल स्टेशनजवळ मुंबई-गांधीनगर वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसची एका गायीला धडक बसली होती.
त्यामध्ये रेल्वेचे नुकसान झाले होते. तर त्या आधी ७ ऑक्टोबर रोजी गुजरातच्या आनंदजवळ मुंबईला जात असताना एका गायीलाही धडक बसली होती.
तर 6 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वाटवा आणि मणिनगर रेल्वे स्थानकांदरम्यान मुंबईहून गांधीनगरला जात असताना रेल्वेच्या धडकेत चार म्हशींचा मृत्यू झाला होता.
त्यावेळीही रेल्वेचे नुकसान झाले होते. तर त्याआधी काही दिवसांपूर्वी 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनला हिरवी झेंडा दाखवून उद्घाटन केले होते.