भयानक ! सकाळी लवकर न उठण्याची क्रूर शिक्षा, १२ विद्यार्थ्यांना गरम चमच्यानं डागलं, कुठे घडली ही सुन्न करणारी घटना ?

| Updated on: Oct 27, 2023 | 5:44 PM

एका विद्यार्थ्याचे वडील त्याला भेटायला आल्यावर त्यांना त्याच्या पायावर काही व्रण दिसले. पण भीतीमुळे तो काहीच बोलत नव्हता. अखेर वडिलांनी खूप समजावल्यावर त्याने तोंड उघडलं, पण त्याने जे सांगितलं ते ऐकून त्याचे वडील हादरलेच.

भयानक ! सकाळी लवकर न उठण्याची क्रूर शिक्षा, १२ विद्यार्थ्यांना गरम चमच्यानं डागलं, कुठे घडली ही सुन्न करणारी घटना ?
Follow us on

गांधीनगर | 27 ऑक्टोबर 2023 : ‘छडी लागे छमछम.. विद्या येई घमघम’, लहानपणी हे गाणं आपल्यापैकी बहुतांश लोकांनी ऐकलं असेलचं. बऱ्याच जणांवर या गाण्याचं प्रॅक्टिकलही झालं असेल कदाचित. विद्यार्थ्यांना तावूनसुलाखून तयार करण्यासाठी पूर्वी शिक्षक अशी शिक्षा करायचेही पण ती जीवघेणी कधीच नसायची. प्रत्येक विद्यार्थ्याचं भलं व्हावं हीच त्यामागची तळमळ.

पण काही वेळा शिस्तीच्या नादात अशी शिक्षा केली जाते ज्यामुळे विद्यार्थी अक्षरश: कळवळतात. अशी जीवघेणी शिक्षा काय कामाची ? असाच एक हैराण प्रकार गुजरातमधील (gujrat) साबरकांठा जिल्ह्यात घडला आहे. तेथील एका निवासी शाळेतील व्यवस्थापकाचे क्रूर कृत्य उघडकीस आलं आहे. त्याने 12 विद्यार्थिनींना स्टीलच्या गरम चमच्याने चटका दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि अशी शिक्षा का ? तर फक्त ती मुलं सकाळी लवकर उठू शकली नाहीत म्हणून ही शिक्षा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. एवढचं नव्हे तर आता तुम्ही लवकर उठला नाही तर तुम्हाला आणखी शिक्षा होईल, असे व्यवस्थापकाने त्या मुलांना दरडावून सांगितलं. प्रदोन महिन्यांपूर्वी घडलेला हा निर्घृण शिक्षेचा प्रकार आत्ता उघडकीस आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, साबरकांठा जिल्ह्यात नचिकेता विद्या संस्थेच्या नावाने एक निवासी शाळा आहे. मात्र,या शाळेची अधिकृत नोंदणी झालेली नाही. ती नोंदणीशिवाय चालवला जात आहे. या शाळेतील एका १० वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी, रामाभाई तराल यांनी या शाळेचे व्यवस्थापक रणजित सोळंकी यांच्याविरुद्ध खेरोज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुमारे दोन महिन्यांपूर्वी रणजीत सोळंकी याने त्यांच्या मुलासह अन्य 11 विद्यार्थ्यांना स्टीलच्या गरम चमच्याने चटका दिला, असा आरोप रामाभाई यांनी केला. एवढंच नव्हे तर रणजीत सोळंकी हा विद्यार्थ्यांना रोज धमकवायचा, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले.

डेप्युटी SP नी दिली माहिती

विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तपास केला. त्या तपासात ही शाळा नसून नोंदणीकृत नसलेले गुरुकुल असल्याचे समोर आले आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना उपनिषद, रामायण आणि वेद शिकवण्यासाठी ट्रस्टद्वारे वसतिगृहाची सुविधा चालवली जाते, असे याप्रकरणी डेप्युटी SP स्मित गोहिल यांनी सांगितले.
पीडित विद्यार्थ्याचे वडील रामाभाई तराल यांच्या तक्रारीनुसार, सकाळी लवकर न उठल्याबद्दल रामाभाई यांचा मुलगा आणि अन्य ११ अल्पवयीन मुलांना रणजीत सोळंकी हा ओरडला.

पायावरील डाग पाहून आली शंका आणि उघड झाला धक्कादायक प्रकार

त्या निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा छळ केला जातो, अशी माहिती मला आठवड्याभरापूर्वी मिळाली. त्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का हे तपासण्यासाठी मी काही दिवसांपूर्वीच शाळेत गेलो होतो. माझ्या मुलाच्या पायावर जळाल्याचे डाग, व्रण दिसत होते पण भीतीपायी तो काहीच बोलला नाही, त्याने तोंडच उघडल नाही. नंतर काही दिवसांनी त्याने मला सांगितलं की सुमारे दोन महिन्यांपूर्वी आम्ही लवकर उठलो नाही म्हणून रणजीत सोळंकी आम्हाला ओरडले होते, असं रामाभाई म्हणाले.

विद्यार्थी लवकर उठले नाहीत म्हणून रणजीत याने शिक्षा म्हणून एकामागून एक असे १२ विद्यार्थ्यांना गरम चमच्याने चटका दिला होता. पण या घटनेमुळे विद्यार्थी एवढे घाबरले होते की त्यांनी त्यांच्या पालकांसमोर तोंडच उघडलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.