गुजरात : गुजरातमधील (Gujrat)आणंद (Anand) जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. काँग्रेस आमदार पूनम परमार यांच्या जावयावर मद्यधुंद अवस्थेत गाडीने अनेकांना उडविले आहे. त्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच काहीजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील डाळी गावाजवळ झाला. विशेष म्हणजे गाडीचा चालक हा पूनम परमार यांचा जावाई असून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये रक्षाबंधनासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी आणि आईचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. चालकावरती रुग्णालयात उपचार सुरु असून तब्येत बरी झाल्यानंतर पोलिस चालकाला ताब्यात घेणार आहे.
Gujarat | Six people died in an accident that took place between a car, bike & auto rickshaw at around 7pm in Anand. Four people on the auto & two on bike died on spot & driver of the car is under treatment in a hospital. Investigating underway: Abhishek Gupta, ASP Anand (11.08) pic.twitter.com/PGWkHgAT8L
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) August 11, 2022
गाडीवर गुजरात आमदार असे लिहिले आहे. कार चालकावर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कार चालक हा काँग्रेस आमदाराचा जावई असल्याची माहिती समजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील डाळी गावाजवळ झाला. या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. रक्षाबंधनाचा सण साजरा करून कुटुंबीय परतत असताना आनंदच्या सोजित्राजवळ हा भीषण अपघात झाला.
परिसरातील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मामाच्या घरी राखी बांधण्यासाठी गेलेल्या दोन बहिणी आणि त्यांच्या आईचाही समावेश आहे. या प्रकरणी सोजित्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सदोष मनुष्यवधा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आनंदचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभिषेक गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार आणंदमध्ये सायंकाळी 7 वाजता कार, दुचाकी आणि ऑटो रिक्षा यांच्यात झालेल्या धडकेत सहा जण ठार झाले. ऑटोमधील चार जण आणि दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. कार चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.