‘अरे काहीतरी नोकरी-धंदा कर रे’ आईचे शब्द ऐकताच भडकला, मुलानं आईला चाकूच भोसकला

| Updated on: Jun 10, 2022 | 12:08 PM

बेरोजगार राहण्यापेक्षा काहीतर काम कर. नोकरी धंदा पाहा, असं आईतच्या आईने त्याला म्हटलं होतं. याचा राग आल्यानं अमृतने आईसोबत भांडण करण्यास सुरुवात केली.

अरे काहीतरी नोकरी-धंदा कर रे आईचे शब्द ऐकताच भडकला, मुलानं आईला चाकूच भोसकला
गुजरातमधील भीषण घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मोबाईल खेळण्यापासून रोखणाऱ्या आईची हत्या (Mother murder) झाल्याची उत्तर प्रदेशातील घटना ताजी असतानाच आणखी आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. पुन्हा एकदा जन्मदात्या आईचा मुलानंच आईवर जीवघेणा हल्ला (Attempt to murder) केला. चाकूने भोसकून मुलानं आईची हत्या करण्याचा प्रयत्न केला. गुजरातमध्ये (Gujrat crime news) ही धक्कादायक घडना घडली आहे. आईवर सपासप वार करुन मुलगा फरार झालाय. आता फरार मुलाला शोध पोलीस घेत आहेत. रात्री दोन वाजता मुलगा घरी परतला होता. तेव्हा आईने त्याला कुठे काम बघ, नोकरीधंदा कर, असं म्हटलं. यावरुन वाद झाला. मुलगा संतापला. त्यानंतर रागाच्या भरात आईवर चाकूने सपासप वापर केले. या घटनेत गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आईवर हल्ला करुन घरातूल पळून जाताना या मुलानं घरातल्या लोकांना धमकीही दिली. कुणाला काही बोललात तर तुम्हालाही मारुन टाकेन, असं या मुलाने जाता जाता घरातल्यानं खडसावलं होतं.

आईच्या जीवावर उठला मुलगा

गुजरातच्या भुजमध्ये ही खळबळजनक घटना घडली. भुजमधील रावलवाडीमध्ये राहणाऱ्या वाघेला कुटुंबात ही घटना घडलं. छोट्याशा वादातून अमृत प्रेमजी वाघेला यांने आपल्याच आईवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. गोमतीबेन प्रेमजीभाई वाघेल यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.

चाकूने सपासप वार

बेरोजगार राहण्यापेक्षा काहीतर काम कर. नोकरी धंदा पाहा, असं आईतच्या आईने त्याला म्हटलं होतं. याचा राग आल्यानं अमृतने आईसोबत भांडण करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात आईवर जीवघेणा हल्लाही केला. आईच्या छातीवर धारदार चाकूने वार केले. यानंतर तो घरातून पळून जाण्यासाठी धडपडत होता.

हे सुद्धा वाचा

घरातून पळून जाताना त्याने घरातल्या लोकांनाही धमकावलं. पुन्हा जर मला काम करायला सांगितलं तर, सगळ्यांना मारुन टाकेनं, असं धमकी देत अमृत घरातून पळून गेला. यानंतर घरातल्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या गोमती बेन यांना भुज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिस सध्या या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत. जीवे मारण्याची धमकी देणं आणि जीवघेणा हल्ला करणं, अशा आरोपांखाली पोलिसांकडून पुडील तपास केला जातोय.