IAS अधिकाऱ्याची बायको गँगस्टरबरोबर पळाली, पोलीस मागे लागले, नवऱ्याने घरात घेतले नाही, अखेर तिने…

| Updated on: Jul 28, 2024 | 1:40 PM

पोलिसा्ंचा ससेमिरा चुकविण्यासाठी सुर्या आपल्या आयएएस पतीकडे मदत मागायला आली होती. परंतू आयएएस पतीने मोलकरनीला तिला घरात घेऊ नको असा दम देऊन ठेवला होता. त्यामुळे अखेर तिने धक्कादायक पाऊल उचलले....

IAS अधिकाऱ्याची बायको गँगस्टरबरोबर पळाली, पोलीस मागे लागले, नवऱ्याने घरात घेतले नाही, अखेर तिने...
crime news lll
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

एका आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने एका गँगस्टर बरोबर घरोबा केला होता. त्यानंतर आयएएस नवऱ्याने तिला घटस्फोटाची धमकी दिली. तिच्यासाठी घराचे दरवाजे कायमचे बंद झाले. एका लहान मुलाच्या अपहरण प्रकरणात तिच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तिने पुन्हा नवऱ्याच्या घरी येण्याचा प्रयत्न केला तर घरातील मोलकरणीने दरवाजा लावून घेतल्याने तिने अखेर विषप्राशन केले. आता तिच्या आयएएस पतीने तिचा मृतदेह देखील ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. ही खळबळजनक प्रेम त्रिकोणाचा ड्रामा एखाद्या साऊथ इंडियन चित्रपटातील नसून गुजरात आणि तामिळनाडू या दोन राज्यातील प्रेम त्रिकोणाची  खरी कहाणी आहे.

नऊ महिन्यांपूर्वी आपल्या आयएएस पतीला सोडून तामिळनाडू येथील गॅंगस्टर सोबत पळून गेलेली 45 वर्षीय सुर्या जय आपल्या आयएएस पतीच्या घरी गुजरातला आली होती. तिथे मोलकरनीने तिला घरातच घेतले नाही. अखेर घराच्या दारात तिने विष पिऊन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. तिने 108 एम्ब्युलन्सला कॉल केला आणि पोलिस घरी आले. त्यांनी तिला हॉस्पिटलला नेले. रविवारी सुर्या हीचा मृत्यू झाला. गुजरातच्या गांधीनगर सेक्टर 19 मध्ये हा प्रकार घडला आहे.

घटनास्थळी चिट्टी सापडली…

तामिळनाडू पोलिसा्ंचा ससेमिरा चुकविण्यासाठी सुर्या आपल्या आयएएस पतीकडे मदत मागायला आली होती. परंतू पतीने मोलकरनीला तिला घरात घेऊ नको असा दम देऊन ठेवला होता. तामिळनाडू पोलिसांनी सूर्या जय हिच्या विरोधात मदुराई येथील एका 14 वर्षांच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. आयएएस आणि गुजरातच्या वीज नियामक आयोगाचे सचिव असलेले रंजित कुमार आणि सुर्या हे दाम्पत्या साल 2023 मध्ये वेगळे झाल्याचे वकील हितेश गुप्ता यांनी सांगितले. सुर्या हीला घटस्फोट देण्याच्या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली होती. त्यांनी सुर्या हीला घरात येऊ नको असे बजावले होते. त्यानंतर तिने विषप्राशन करुन 108 एम्ब्युलन्सला बोलाविले. पोलिसांनी घटनास्थळावरुन तमिळभाषेत लिहीलेली चिट्टी देखील जप्त केली असून अधिक काही माहीती देण्यास नकार दिला आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

सुर्या हीचे नाव तिचा गँगस्टर बॉयफ्रेंड महाराजा हायकोर्ट आणि त्याचा सहकारी सेंथिल कुमार यांच्यासोबतच्या केसमध्ये आल्याने ती चर्चेत आली होती.एका 11 वर्षांच्या मुलाच्या आईशी पैशावरुन वाद झाल्याने तिच्या अपहरण केल्याच्या प्रकरणात पोलिस सुर्या हीच्या मागे लागले होते. त्यामुळे आयएएस पतीची मदत मागण्यासाठी ती आली होती. परंतू तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पतीने तिचा मृतदेह देखील ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.