शिर्डीत भरदिवसा पार्किंगमध्ये गोळीबार ! दोन गोळ्या झाडून आरोपी फरार, जीवितहानी नाही

| Updated on: Mar 21, 2024 | 2:25 PM

शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. शिर्डी शहरातील खाजगी पार्किंगमध्ये दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिची समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

शिर्डीत भरदिवसा पार्किंगमध्ये गोळीबार ! दोन गोळ्या झाडून आरोपी फरार, जीवितहानी नाही
Follow us on

शिर्डी | 21 मार्च 2024 : शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. शिर्डी शहरातील खाजगी पार्किंगमध्ये दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिची समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. शिर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. बंदुकीतून दोन गोळ्या झाडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. गोळीबार करून आरोपी फरार झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारच्या सुमारास शिर्डी शहरातील खासगी पार्किंगमध्ये गोळीबाराचा आवाज आल्याने एकच खळबळ माजली. भरदिवसा हा गोळीबार झाला. मात्र या गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या, गोळीबार का केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. आरोपींनी बंदूकीतून दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी ही समोरत्या हॉटलेमधील रुमची काच तोडून आत घुसली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोळीबारानंतर आरोपींनी तेथून लागलीच पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. गोळीबार झाला तिथे व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळतंय का याचाही पोलिस शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. साईभक्तांची सुरक्षा ठेवा अन्यथा आंदोलनाचा पावित्रा हाती घेऊ , असा इशारा शिर्डी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. हा गोळीबार नेमका का झाला आणि कोणी केला याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.