कोल्हापूर : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना कोल्हापूर कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने (Kolhapur District Court) सदावर्ते यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आलीय. सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि फिर्यादींच्या वतीनं वकील शिवाजीराव राणे यांनी कोर्टात बाजू मांडली. तर सदावर्ते यांच्या बाजूनं पीटर बारदेस्कर यांनी युक्तिवाद केला. कोल्हापूर पोलिसांकडे सदावर्तेंचा ताबा येण्याआधी त्यांना सातारा पोलिसांच्या हवाले करण्यात आलं होतं. मात्र सातारा जिल्हा सत्र न्यायालयानं बुधवारी गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा दिला होता. गिरगाव कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांना देण्यात आला होता.
कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस स्थानकात गुणरत्न सदावर्तेंविरोधात तक्रार देण्यात आली होती. मराठा समाज समन्वय समितीचे दिपील मधुकर पाटील यांनी ही तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोल्हापुरामध्ये कलम 153 अ नुसार गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि एकोप्याला बाधा येईल, अशी कृती केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच सदावर्ते यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा आरोप केलाय. तसंच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारं सदावर्तेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी दिलीप पाटील यांनी केली होती.
कोल्हापूर पोलीस सदावर्ते यांना घेऊन आर्थर रोड कारागृहातून कोल्हापूरकडे रवाना झाले होते. कोल्हापूर पोलीस सदावर्ते यांना घेऊन जाण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहोचले आणि त्यांना घेऊन निघाले. त्यावेळी सदावर्ते यांनी भारत माता की जय… वंदे मातरम् … अशा घोषणा दिल्या. यापूर्वीही त्यांनी मुंबई पोलीस आणि सातारा पोलिसांच्या ताब्यात असताना, कोर्टात घेऊन जाताना माधम्यांच्या कॅमेरासमोर घोषणा दिल्या होत्या. त्याचबरोबर कॅमेरासमोर ते सातत्याने व्हिक्टरी साईनही दाखवतात.
इतर बातम्या :