मुंबई : दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) पलायन केलेलेल्या गुप्ता बंधूना यूएईतून अटक (Arrest in UAE) करण्यात आली आहे. त्यांच्यावर दक्षिण आफ्रिकेत कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे. 2018 पासून त्यांचा शोध सुरु होता. अखेर इंटरपोलच्या मदतीनं गुप्ता बंधूंना अटक करण्यात आली. राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या गुप्ता बंधूंची नावं आहेत. गुप्ता बंधू (Gupta Brothers) यांनी आफ्रिकेच्या पूर्व राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप आहे. आता गुप्ता बंधूंच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडूनच याबाबतची माहिती देण्यात आली आहे. गुप्ता बंधूंमध्ये एकूण तिघांचा समावेश आहे. यातील राजेश आणि अतुल यांना जरी बेड्या ठोकण्यात आल्या असल्या, तरी तिसरा भाऊ अजय गुप्ताला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अजय गुप्ता यांना अटक का केली गेली नाही, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. यूएईच्या प्रवर्तन अधिकाऱ्यांनी गुप्ता बंधूंना अटक केली. सोमवारी ही अटकेची कारवाई करण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेत जेकम जुमा हे राष्ट्रपती असताना, एक मोठी घटना घडली होती. जेकम जुमा यांच्यासोबत गुप्ता बंधू यांचे जवळचे संबंध होते. याचा गैरफायदा गुप्ता बंधूंनी उठवला. पैसे लाटणं आणि वरीष्ठ पदांवर नियुक्त्या करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. 2018 साली जेव्हा ही बाब समोर आली होती, तेव्हा गुप्ता बंधू फरार झाले होते.
2018 साली आपल्या मर्जीनं गुप्ता कुटुंब दक्षिण आफ्रिका देश सोडून गेलं होतं. दुबईमध्ये त्यांनी आपलं बस्तान बांधलं होतं. पण दुबईमध्ये येण्याआधी गुप्ता बंधूंनी दक्षिण आफ्रिकेतील चलन असलेल्या रैंडची मोठ्या प्रमाणात लूट केली होती. तब्बल 15 बिलिय रैंड्स इतके पैसे गुप्ता बंधूंनी लुटले होते. स्थानिक तपास यंत्रणांनी केलेल्या तपासातून ही बाब उघडकीस आली होती. तपास अधिकारी वेन डुवेनहेज यांनी याबाबती माहिती दिलीय.
Media Statement : Ministry of Justice confirms Gupta arrest pic.twitter.com/jkNc3fkirN
— Ministry of Justice and Correctional Services ?? (@Min_JCS) June 6, 2022
इंटरपोलने याआधीच गुप्ता बंधूविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. अमेरीकेसर इंग्लंडमध्येही त्यांना बॅन करण्यात आलं होतं. जेव्हा कोट्यवधी रुपये लुटल्याची बाब उघडकीस आली होती, तेव्हा दक्षिण आफ्रिकेतील नागरीकांना जेकम जुमा यांच्याविरोधात तीव्र निदर्शनं केली होती.
आता गुप्ता यांना लवकरच पुन्हा दक्षिण आफ्रिकेत आणलं जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. खरंतर या आधी त्यांना अटक केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत आणणं शक्य नव्हतं. मात्र यूएई आणि आफ्रिकेत 2021 साली झालेल्या करारामुळे आता गुप्ता बंधूंचं प्रत्यार्पण केलं जाणार आहे.
South Africa on Monday, 6th June, said the UAE had arrested Rajesh Gupta and Atul Gupta, brothers who face charges of political corruption under former South African President Jacob Zuma: Reuters
— ANI (@ANI) June 7, 2022
गुप्ता बंधू हे मूळचे भारतातीलच आहेत. 1990 साली गुप्ता कुटुंब दक्षिण आफ्रिकेत गेले. तिथं चपलाचं दुकान उघडलं. त्यानंतर अख्खं कुटुंब तिथेच स्थाईक झालं. त्यानंतर गुप्ता परिवारानं आईटी, मीडिया आणि खाण कंपन्यांही उघडल्या. आता यापैकी बहुतांश कंपन्या एकतर विकल्या गेल्या किंवा बंद पडल्यात.
बँक ऑफ बरोदाचंही नाव या घोटाळ्यात समोर आलं होतं. जेव्हा दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या नावे बँक अकाऊंट उघड्यावर बंधनं आली होती, तेव्हा गुप्ता कुटुंबाने बँक ऑफ बरोदाची मदत घेतल्याचंही सांगितलं जातं. दरम्यान, हल्ली बँक ऑफ बरोदानं आपला दक्षिण आफ्रिकेतील गाशा गुंडाळलाय.