विवाहित महिलेला मॅट्रेमोनिअल साईटवरील एक चुक नडली, चार वर्षांनी समोर आली धक्कादायक बाब

| Updated on: Feb 22, 2023 | 10:09 AM

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंबई नाका पोलीस ठाण्यात 2018 साली दाखल झालेल्या फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या गुन्ह्याची विशेष पोस्को न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.

विवाहित महिलेला मॅट्रेमोनिअल साईटवरील एक चुक नडली, चार वर्षांनी समोर आली धक्कादायक बाब
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : मॅट्रेमोनिअल साईटवर नाशिक मधील एका महिलेने ( Married Women ) अकाऊंट उघडले होते. त्यावेळी तीने अनेक पुरूषांचे प्रोफाइल बघितले होते. त्यावेळी तिला रविश प्रभाकर दुरगुडे या व्यक्तिची प्रोफाइल आवडली होती. त्याचवेळी दोघांनी एकमेकांशी बोलणं सुरू केलं होतं. त्यावेळी रविशने आपले लग्न झालेले नाही ही बाब प्रोफाईलवर नमूद केली नव्हती. त्यामुळे दोघांचे बोलणं वाढत असतांना दोघांनी लग्न करण्यापर्यंतचा निर्णय घेतला. यामध्ये दोघांचे भेटणं बोलणं सुरू राहिलं. त्यानंतर विवाहित महिलेला घेऊन रविश हा विविध ठिकाणी घेऊन जात अत्याचार ( Physical abuse ) करत होता.

रविष दुरगुडे यांचे लग्न झालेले असल्याचे महिलेला समजले होते. त्यानंतर महिलेने लग्न करत का नाही म्हणून विचारणा केली. त्यानंतर आपली फसवणूक झालीची आणि आमिष दाखवून अत्याचार केल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण विशेष विशेष पोक्सो न्यायालयात गेलं होतं. त्यावरून नुकतीच सुनावणी पार पडली आहे.

हे सुद्धा वाचा

यामध्ये रविष दुरगुडे न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि तीन हजारांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान पीडित महिलेने 2018 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली असून तिला न्याय मिळाला आहे.

आरोपी दुरगुडे याने विवाहित असतांना मॅट्रेमोनिअल साईटवर अकाऊंट उघडतांना त्याने अविवाहित नमूद केले होते. ती बाब फसवणूक करण्यासाठी महत्वाची ठरली आहे. त्यानंतर खोटे बोलून फसवणूक करत अत्याचार केल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

मॅट्रेमोनिअल साईटवर दुसरे स्थळ बघत असतांना विवाहित महिलेची फसवणूक झाली आहे. विवाहित महिला ही आपल्या मुलांसह नाशिकमध्ये राहत असल्याने तीने नाशिक पोलिसांत धाव घेतली होती.

दरम्यान मॅट्रेमोनिअल साईटवर स्थळ शोधत असतांना किंवा अकाऊंट उघडतांना काळजी घ्या. त्यातून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहे. अशा सूचना पोलिसांकडून अनेकदा दिल्या जातात. तरी देखील अशा घटना घडत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.