Pune Crime : अमेरिकेत अडचणीत सापडलेल्या बहिणीला पैसे पाठविले, परंतू सायबर चाच्यांनी दीड लाख हडपले

| Updated on: May 05, 2023 | 1:34 PM

बहिणीला खरोखरच काही अडचण आली असेल म्हणून त्यांनी मॅसेज आलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर गुगल पे केले, परंतू ते पैसे थेट सायबर चाच्यांच्या घशातच गेले.

Pune Crime : अमेरिकेत अडचणीत सापडलेल्या बहिणीला पैसे पाठविले, परंतू सायबर चाच्यांनी दीड लाख हडपले
प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञाच्या नावे महिला डॉक्टरची फसवणूक
Image Credit source: socialmedia
Follow us on

pune crime : सायबर भामट्यांनी उच्छाद मांडला असल्याने ऑनलाईन ( Online ) व्यवहार करताना अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. पुण्याच्या एका भावाला त्याची अमेरिकेतील बहिण आर्थिक अडचणीत असल्याचा मॅसेज व्हॉट्सअपवर आला आणि त्याने प्रथम पैसे देण्यास नकार दिला. नंतर ती नाराज झाली असे समजून त्याने ऑनलाईन पैसे पाठविले. परंतू त्याच्या बहिणीचा फोटो व्हॉट्सअप प्रोफाईलला ( whatsapp profile ) लावून सायबर भामट्यांनी ( cyber crime )  त्याला फसविल्याचे उघडकीस आले आहे.

डेक्कन परिसरात राहणाऱ्या एका 47 वर्षीय नागरिक व्यावसायिक आहेत. त्यांची बहीण लग्न होऊन अमेरिकेत वास्तव्याला आहे. या बहीणीचा ती आर्थिक अडचणीत असल्याचा मॅसेज या व्यावसायिकाच्या व्हॉट्सअपवर आला. बहिणीने त्यांच्याकडे पैसे देखील मागितले. सुरूवातीला त्यांनी काही रिप्लाय दिला नाही. नंतर त्यांनी पैसे नेमके कशासाठी पाहीजेत अशी विचारणा चॅटींगद्वारे केली आणि आपण आता पैसे देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर बहिणीने पैसे पाठविता येत नसतील तर नको पाठवू असा मॅसेज त्यांना पाठविला. आणि बोलले चॅटींग करणे बंद केले.

व्हॉट्सअप नंबरवर दीड लाख पाठविले

बहिणीला खरोखरच काही अडचण आली असेल ती कारण सांगू शकत नसेल असे त्यांना वाटले. त्यानंतर आपली बहिण नाराज झाल्याचे समजून त्यांनी गुगल पेवरून मॅसेज आलेल्या नंबरवर दीड लाख रूपये पाठविले. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी त्यांचा आपल्या बहिणीशी संपर्क झाला असता तिने त्यांना आपण कधीच पैसे मागितले नसल्याचे सांगितले. तसेच हा मोबाईल क्रमांकही आपला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आपली पुरती फसगत झाल्याचे स्पष्ट झाले.

28 एप्रिल ते 1 मे 2023 दरम्यानचा प्रकार

आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर या व्यावसायिकाने अखेर  डेक्कन पोलीस ठाणे गाठून फसवणूकीची तक्रार दाखल केली. 28 एप्रिल ते 1 मे 2023 दरम्यान हा ऑनलाईन गंडा घातला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात सायबर गुन्हा दाखल झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.