crime news : पोलीसांनी पकडू नये म्हणून वेष बदलून भिक मागणे सुरू केले, अखेर तीन वर्षांनी पोलीसांच्या तावडीत सापडला

| Updated on: Feb 14, 2023 | 9:02 PM

त्याने अखेर आपली ओळख बदलून भिकारी बनून रहाण्यास सुरूवात केली होती. त्यासाठी त्याने एका अपंग व्यक्तीची मदत घेत रस्त्यावरील सिग्नलवर भिक मागण्यास सुरूवात केली

crime news : पोलीसांनी पकडू नये म्हणून वेष बदलून भिक मागणे सुरू केले, अखेर तीन वर्षांनी पोलीसांच्या तावडीत सापडला
beggar- santro
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : खूनाच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेला एक आरोपी पोलीसांना वेष बदलून भिक मागताना सापडला. हा आरोपी भिक मागण्याच्या ठिकाणी सॅंण्ट्रो कारने ( santro car ) जायचा आणि कार थोड्या अंतरावर थांबवून आपल्या अन्य एका अपंग मित्राच्या मदतीने हा आरोपी सिग्नलवर ( signal ) भिक मागायचा असे तपासात उघड झाले होते. दिल्ली ( delhi ) पोलीसांनी गाझियाबाद येथून या आरोपीला अटक केली आहे. शाहजाद उत्तर – पश्चिम दिल्लीतील 2019  झालेल्या एका खून प्रकरणात पसार झाला होता. या खून प्रकरणात त्याचा सहकारी वकील याला पोलीसांनी अटक केली परंतू शाहजाद फरार झाला होता.

खून प्रकरणातील एका आरोपीला पोलीस तीन वर्षे शोधत होते. परंतू तो दर वेळेला आपला ठीकाणा बदलत होता आणि पोलीसांना गुंगारा देत होता. त्याने अखेर आपली ओळख बदलून भिकारी बनून रहाण्यास सुरूवात केली होती. त्यासाठी त्याने एका अपंग व्यक्तीची मदत घेत रस्त्यावरील सिग्नलवर भिक मागण्यास सुरूवात केली होती. तरीही पोलीसांनी त्याचे ढोंग उघडकीस आणत त्याला अटक केली आहे.

गेली तीन वर्षे मर्डर केसमधील आरोपी शहजाद ( 33 ) याने ओळख बदलून भिकारी बनत एक अपंग सहकारी फूल हसन याची सोबत घेत गाजियाबादच्या रस्त्यावर भिक मागणे सुरू केले होते. कोणतीही कार सिग्नलवर थांबताच तो त्याचा साथीदार हसन याची मदत घेत काचेवर टकटक करून वाहन चालकांकडून भिक मागत असत. परंतू याच त्याच्या सवयीने पोलीसांच्या हातात आला.

शाहजाद उत्तर – पश्चिम दिल्लीतील 2019  झालेल्या एका खून प्रकरणात पसार झाला होता. या खून प्रकरणात त्याचा सहकारी वकील याला पोलीसांनी अटक केली परंतू शाहजाद फरार झाला होता. त्याच्या विरोधात पोलीसांनी प्रोक्लेम नोटीस जारी केली होती. तो सतत आपला ठिकाणा बदलत होता. आणि पोलीसांना गुंगारा देत होता. त्यानंतर पोलीसांना टीप मिळाली की, तो त्याची फॅमिली आणि 62 वर्षीय वडीलांसह गाझियाबादला रहायला आले आणि पोलीस तपास सुरू झाला.

गेली तीन वर्षे पोलीस तांत्रिक पुराव्या वरून त्याचा माग घेत होते. नंतर कळले की आरोपीने सॅन्ट्रो व्हॅनही घेतली होती, त्यातून त्याने प्रवास करीत अनेक जागा बदलल्याचे पोलीसांनी सांगितले. त्याच्या घराचा पत्ता वारंवार तो बदलत होता. शेवटी त्याचे घर पोलिसांना सापडले. त्याचा शेजारी तसेच जागा मालकाने शाहजाद त्याच्या सॅण्ट्रोने गेला असून संध्याकाळी परतणार असल्याचे पोलीसांना सांगितले. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला असता ही सॅण्ट्रो कार अनेक सिग्नलवर थांबल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दुकानदार आणि त्या रस्त्याने जाणाऱ्यांकडे शाहजाद बद्दल विचारणा केली असता.

कार काही अंतरावर पार्क केल्यानंतर शाहजाद आपले कपडे बदलून जुने कपडे घालायचा, तो आणि त्याचा अपंग मित्र गर्दीच्या ठीकाणी संध्याकाळपर्यंत भिक मागायचे. पोलीसांनी अखेर ट्रॅपलावून त्याला अटक केली. त्याचा साथीदार हसन याला तो खूनाचा फरार आरोपी असल्याचे माहीती नसल्याचे त्याने पोलीसांना सांगितले.

शाहजाद आणि हसन यांना एकत्रितपणे भिक मागताना काहीवेळा दिवसाला दोन हजार रूपयांची कमाई देखील व्हायची, शाहजाद हा गरीब कुटुंबातील असून तो प्रकृतीने मजबूत असल्याने त्याने बाऊन्सरची नोकरी केली होती. त्यातून त्याची गुन्हेगारी वर्तुळाशी ओळख झाल्याचे डीसीपी ( क्राईम ) विचित्र वीर यांनी सांगितले.