हैदराबाद : आपले काका एका दूरच्या प्रवासावर गेले असल्याचे पाहून पुतण्याने त्यांच्या घराच चोरी करण्याची योजना आखली. त्या बरहुकूम घरात कोणी नसल्याची संधी साधत या पुतण्याने डाव साधत 32 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या लांबवल्या. परंतू घराब सीसीटीव्हीचा अंदाज त्याला आला नसल्याने त्याची चोरी पचली नाही. पुतण्या सूरज याला जुगाराचा नाद लागला होता. ऑनलाईन लॉटरीत त्याचा बराच पैसा बुडाल्याने तो कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
रामगोपाळपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदराबाद येथे एका व्यापाऱ्याच्या घरात 32 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या. या घराचे मालक व्यापारी असल्याने ते ११ फेब्रुवारीला रंगारेड्डी जिल्ह्यात फॅक्टरीच्या पुजेसाठी गेले होते. त्यामुळे घरात कोणी नसल्याची संधी साधत या व्यापऱ्याचा पुतण्या सुरज मलाणी याने स्वत:च्या काकांचे घर फोडायचे ठरविले. त्याप्रमाणे योजना आखली. आणि घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने हळूच कपाटातील लॉकरमधून काकीच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्या.
या घराचे मालक गोपालदास पुन्हा आपल्या घरी परतले तेव्हा त्यांना तिजोरी उघडताच त्यांना मोठा धक्का बसला कारण त्यांच्या पत्नीसाठी त्यांनी नुकतेच बनविलेले दागिने जागेवर नव्हते. घराचे लॉक तोडल्याचे किंवा बाहेरून घरात कोणी आल्याचे कोणतेही पुरावे न आढळल्यामुळे ते चोरी कशी आणि कोणी केली असावी अशा विचारात ते पडले.
गोपलदास यांनी आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार रामगोपालपेट पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला. घरात काही इतर वस्तू जागेवरच असल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलीसांना संशय आला. पोलीसांनी घराच्या समोरील सीसीटीव्ही तपासले असता एक जण बाईकवर बॅग ठेवून पळताना दिसला. हे फूटेज जेव्हा गोपालदास यांना दाखवले तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण त्यांचा पुतण्या सूरज मुलानी यानेच चोरी केल्याचे उघडकीस आले. सूरज याला जुगाराचा नाद लागला होता. ऑनलाईन लॉटरीत त्याचा बराच पैसा बुडाल्याने तो कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.