नाशिक : मैत्रीमध्ये तरुणाने गैरफायदा घेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका युवतीला तिच्याच जुन्या मित्राने जंगलात नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकवरुण पीडित तरुणीला पालघरच्या जंगलात घेऊन जात बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी ही गंभीर घटना घडली असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीचे नाव योगेश प्रकाश भुयाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची सुरुवात मुंबई नाका हद्दीपासून सुरू झाल्याने पालघर पोलिसांकडून हा गुन्हा टपालाने नाशिक शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. खरंतर पीडित तरुणीच्या कपाळावर तरुणाने दगडाने मारलेले होते. त्यावर तरुणी घरी गेल्यावर आई वडिलांनी काहीतरी बरेवाईट घडल्याचा संशय आला होता. त्यावरून आई वडिलांनी विचारणा केल्यावर पीडित तरुणीने ही सर्व हकीकत सांगितली, त्यावरून या घटनेला वाचा फुटली आहे.
नाशिकमधील भावी डॉक्टर तरुणीवर तिच्याच जुन्या मित्राने पालघरच्या जंगलात घेऊन जात अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
यावेळी पीडित तरुणीवर तरुणाने अत्याचार करत मारहाण केली असून कपाळावर दगडाने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पालघर मध्ये ही घटना घडल्यानंतर तिथे गुन्हा दाखल झाला होता त्यावरून गुन्ह्याची सुरुवात नाशिकच्या महामार्ग बसस्थानक येथून सुरुवात झाल्याने नाशिक शहर पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
पीडित तरुणी संगमनेरमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असून 10 ऑक्टोबर रोजी संगमनेर येथून बसने महामार्ग बसस्थानक येथे आली होती.
नाशिकच्या बसस्थानकावर पीडित मित्रासोबत पालघरला जाण्यासाठी बसची वाट बघत होती.याच दरम्यान संशयित आरोपी योगेश भुयाळ त्यावेळी बसस्थानकात आला होता.
त्याने तरुणीसोबत असलेल्या मित्राला धमकी देत निघून जाण्याचे सांगितले त्यामुळे मित्र भीतीने निघून गेला होता.
ठार मारण्याची धमकी देत संशयिताने बळजबरीने तरुणीला गाडीवर बसवले असून तिने आरडाओरड केली होती. जव्हारमार्गे पालघरच्या दिशेने जात असतांना त्याने अत्याचार केले आहे.