अंबरनाथ: अंबरनाथ (Ambarnath) पोलिसांनी चोरी आणि घरफोडीचे 29 गुन्हे दाखल असलेल्या शिकलकर गॅंगच्या एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. मजेशीर बाब म्हणजे स्वतःच्या लग्नाला पैसे जमवण्यासाठी हा चोरटा चोऱ्या करत होता. अंबरनाथ शहरात 4 मार्चला एकाच रात्रीत 2 मंदिरं आणि 6 घरांमध्ये चोरी झाली होती. या चोरट्यांचा माग काढताना पोलिसांनी (Police) कनवर सिंग टाक याच्यासह एका 17 वर्षीय अल्पवयीन चोरट्याला भगतसिंग नगरमधून बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्या चौकशीत त्याने चोरीच्या या आठही गुन्ह्यांची कबूली दिली. तसंच आपण उल्हासनगरातून (Ulhasnagar) दोन दुचाकी चोरल्याचीही माहिती त्याने यावेळी पोलिसांना दिली.
कनवर सिंग टाक हा शिकलकर टोळीचा सदस्य असून मूळचा पुण्याच्या हडपसर भागात राहणारा आहे. त्याच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरी आणि घरफोडीचे तब्बल 29 गुन्हे दाखल आहेत. मजेशीर बाब म्हणजे त्याने या चोऱ्या आपल्या लग्नाचा खर्च जमवण्यासाठी केल्याचं पोलिसांना सांगित आहे. 4 तारखेला तो पुण्याहून अंबरनाथला आला आणि भगतसिंग नगर भागात राहणाऱ्या मामाच्या मुलासोबत मिळून चोऱ्या केल्याची कबूली त्याने यावेळी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला 6 तारखेला 8 मार्चला अटक केली आहे. त्याच्याकडून मंदिरातून चोरलेला मुद्देमाल, दोन चोरीच्या दुचाकी आणि चोरीसाठी वापरलेली अवजारे जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयाने त्याला 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
अंबरनाथमधील लग्नासाठी पैशांची जमवाजमव करणाऱ्या कनवर सिंग टाक या चोरट्यावर आतापर्यंत तब्बल 29 गुन्हे दाखल आहेत. मजेशीर बाब म्हणजे त्या चोरट्याने या चोऱ्या आपल्या लग्नाचा खर्च जमवण्यासाठी केल्याचं कबुली पोलिसांना दिली आहे. या चोरट्यांचा माग काढताना पोलिसांनी (Police) कनवर सिंग टाक याच्यासह एका 17 वर्षीय अल्पवयीन चोरट्याला भगतसिंग नगरमधून बेड्या ठोकल्या होत्या आहेत. चौकशीत या चोरट्याने केलेल्या आठही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. लग्नासाठी पैशांची जमवाजमव करणाऱ्या या चोरट्याला न्यायालयाने 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर बातम्या