देवानंतर जर आपण कोणाकडून आशा ठेवतो तो म्हणजे डॉक्टर. कारण मृत्यूच्या दाढेतून एखाद्याला माघारी आणण्याची ताकद डॉक्टरकडे असते. पण हेच डॉक्टर जर एखाद्या हैवानासारखे लागले तर विश्वास कोणावर ठेवायचा. कारण एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता, एका महिलेला संशय आल्यावर त्याची बॅग चेक केल्यावर जे काही दिसलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.
एका खासगी फिजिओथेरपी सेंटरच्या टॉयलेटमध्ये चोरून कॅमेरा लावले होते. या कॅमेराबाबत कोणालाचा माहिती नव्हती. या सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेला एका डॉक्टरवर संशय आला. तिने डॉक्टरच्या केबिनमध्ये ठेवलेली बॅग चेक केली. त्यामध्ये तिला ए पेन ड्राईव्ह सापडला. महिलने हा पेन ड्राईव्ह घरी आणून पाहिला, त्यामध्ये असलेले व्हिडीओ पाहून तिला धक्काच बसला. याबाबत तिने आपल्या घरच्यांना सर्व प्रकार सांगितलं. घरच्यांनी पोलिसात धाव घेतली आणि या प्रकरणाची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या तक्रारीनंतर थेट सेंटरवर छापा टाकला. टॉयलेटमधील कॅमेरा आणि चार ते पाच पेन ड्राईव्ह सापडले. या पेन ड्राईव्हमध्येही आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले. हा प्रकार राजस्थानच्या सीकर जिल्ह्यामधलील लक्ष्मणगड येथे घडला आहे. लक्ष्मणगडचे एसपी दिलीप मीना यांनी याबाबत माहिती देताना पेन ड्राईव्ह सापडले असून आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
सध्या सेंटरमधील कर्मचारी जबाब देण्यास नकार देत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाईल. या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, असंही दिलीप मीना म्हणाले.