पाटणा | 5 ऑगस्ट 2023 : ऑनर किलींगच्या नावावर एका भावाने त्याच्या सख्ख्या बहिणीची निर्दयीपटणे हत्या केल्याचे समोर आले आहे. नवादा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. खोट्या सन्मानासाठी मोठ्या भावाने त्याच्या छोट्या, सख्ख्या बहिणीचे (brother killed sister) आयुष्य संपवले. ऑनर किलींगची (honor killing) ही घटना असल्याचे सांगत पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या, तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्रही जप्त केले.
बिहारमधील नवादाजवळील रुपौ ठाणे क्षेत्रात ही खळबळजक घटना घडली आहे.आपल्या सुनेचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार मांझी यांनी नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली असता, काही महत्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागले आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी याप्रकरणी अपहरण झालेल्या महिलेच्या भावाला ताब्यात घेऊन दाखवत चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला. आपणच आपल्या बहिणीचे अपहरण केले व त्यानंतर जंगलात नेऊन तिला संपवले, असे त्यांने सांगितले. शेजारच्या मुलाशी तिचे प्रेमसंबंध होते, ते आपल्याला पसंत नव्हते, म्हणून आपण तिचा जीव घेतल्याची कबुलीही त्याने दिली.
पोलिस त्याला जंगलात घेऊन गेले असतात, त्याने बहिणीचा मृतदेह कुठे लपवला ती जागाही दाखवली. पोलिसांनी मृतदेह तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्रही ताब्यात घेतले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली.